कृष्णा नदीत मगरींची दहशत

विजय पाटील
रविवार, 22 एप्रिल 2018

सांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही वर्षात 8 ते दहा जण दगावले आहेत तर अनेक जण हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्ल्यांनंतर मृतदेहही दोन-दोन दिवस सापडत नाहीत. अशी स्थिती आहे. नुकत्याच झालेल्या घटनेतील सागर याचा मृतदेह तब्बल 40 तासानंतर सापडला. 

सांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही वर्षात 8 ते दहा जण दगावले आहेत तर अनेक जण हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्ल्यांनंतर मृतदेहही दोन-दोन दिवस सापडत नाहीत. अशी स्थिती आहे. नुकत्याच झालेल्या घटनेतील सागर याचा मृतदेह तब्बल 40 तासानंतर सापडला. 

कृष्णा नदीत तब्बल 40 ते 50 मगरींचे वास्तव आहे. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी या मगरी नदी पात्राबाहेर पडत असतात. त्यामुळे आसपासच्या गावांना या मगरीपासून बचाव करावा लागतो. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. अात्तापर्यंत या परिसरातील अनेकजण  मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. अंकलखोप, ब्रह्मनाळ, कसबे डिग्रज, सांगली, तुंग या ठिकाणी नदीवर अांघोळीसाठी, मासेमारीसाठी, वैरणीसाठी गेलेल्या सुमारे ४० जणांवर मगरींनी जीवघेणे हल्ले केले आहेत. या व्यतिरिक्त इनाम धामणी येथे दोन चार-पाच फुटी मगरींची हत्या झाल्याचेही प्रकार घडले आहेत.  

मगरीच्या हल्ल्यात यांचे गेले बळी...

  • अनिकेत कदम (कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३)
  • रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ नोव्हेंबर २००४) 
  • सुनील भोसले (अंकलखोप, १६ एप्रिल २००७) 
  • वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५)
  • अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५)
  • संजय भानुसे (तुंग) 

वाळू उपाशामुळे मगरींची आश्रमस्थाने उद्ध्वस्त

नदीवर विविध कारणांनी जावेच लागते. त्यामुळे अशा घटनेपासून बचावासाठी उपाययोजना व्हायला हव्यात. वाळू उपशामुळे मगरींची आश्रयस्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगर सर्वेक्षणात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आढळल्या. मगर एकावेळी ४० ते ५० पिलांना जन्म देते. यापैकी ४ ते ५ जरी प्रौढ झाल्या, तरी मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. 

मगरी पकडण्याबाबत हवे ठोस धोरण

सध्या वनखाते कागदी घोडे नाचवित आहे. मगरीचे दर्शन व  त्यांची भीती कायमच आहे. मगरी पकडण्याबाबत ठोस धोरण गरजेचे आहे, अशी येथील ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे. गेली कित्येक वर्षे परिसरातील ग्रामस्थ संरक्षक जाळी, नदीवर वीज व्यवस्था याबाबत वन विभागाशी चर्चा करतात. पण काहीच होत नाही. महाजाळी कितपत योग्य ठरते, हेही महत्त्वाचे आहे. प्राणीमित्रांच्या प्रबोधनाचा कितपत उपयोग होतो, हाही प्रश्न आहेच.

Web Title: Sangli News crocodile in Krishna River