बेदाणा उत्पादकांसाठी यंदाचे वर्ष गोड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

सांगली - यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा बेदण्याला प्रतीकिलो सुमारे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या बेदाण्याला प्रतीकिलो १८० ते २६० रुपये दर मिळत आहे. सातत्याने बेदाण्याच्या दरात होत असलेली वाढ यामुळे बेदाणा उत्पादक वाढत्या दरामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. 

तासगाव बाजार समितीत बेदाण्याच्या आवकीतही परिणाम झाला आहे. सध्या तासगाव बाजार समितीत सुमारे सहाशे ते नऊशे टन बेदाण्याची आवक होत आहे. बेदाण्याच्या दरात अजून २५ ते ३० रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात गतवर्षी बेदाण्याचे उत्पादन एक लाख ६० हजार मेट्रिक टन इतके उत्पादन झाले. यंदा द्राक्षाला दर चांगले मिळाल्याने  बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट द्राक्षाची विक्री केली. यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट  होईल असा अंदाज बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली असल्याचे चित्र आहे.

गतमहिन्यापेक्षा चालू महिन्यात बेदाण्याला प्रतिकिलोस १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या बेदाण्याचे दर टप्प्याटप्प्याने ३० ते ४० रुपयांनी वधारले आहेत. तासगाव बाजार समितीत सोमवार,  गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस बेदाण्याचे सौदे होतात. गतवर्षी बेदाण्याच्या प्रत्येक सौद्याला सरासरी एक हजार ५०० ते दोन हजार टन बेदाण्याची आवक होती. मात्र, यंदा बेदाण्याच्या दरात वाढ होत असल्याने प्रत्येक सौद्याला ६०० ते ७०० टन बेदाण्याची आवक होते आहे. बेदाण्याचे दर वाढत असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होते आहे. 

बेदाणा शिल्लक 
जिल्ह्यातील गतवर्षी सर्वच शीतगृहे बेदाण्याचे फुल्ल भरली होती. यंदाच्या हंगामात सुमारे ६५ ते ७० टक्के बेदाणा शीतगृहात बेदाणा शेतकऱ्यांनी ठेवला होता. आजअखेर २५ ते २८ टक्केच बेदाण्याची विक्री झाली आहे. सध्या सांगली आणि तासगाव या दोन्ही ठिकाणी अंदाजे ४० टक्के बेदाणा शिल्लक असल्याची शक्‍यता शीतगृह असोसिएशनच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Sangli News currant production and rate special