धीरज पाटीलला पुण्यात अटक

धीरज पाटीलला पुण्यात अटक

सांगली - मलेशियात हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या पोलिसपुत्र कौस्तुभ पवारचा सहकारी धीरज पाटील याला शहर पोलिसांनी पुण्यात चतु:श्रुंगीजवळ वृंदावन लॉन येथे अटक केली. या फसवणुकीमागे त्याचाच ब्रेन असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याचेही बॅंक खाते गोठवले आहे.

मलेशियात हॉटेल मॅनेजर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार, मोहन शिंदे, दीपक माने आणि सदानंद धनगर यांची फसवणूक कौस्तुभ पवार आणि धीरज पाटील यांनी केली आहे. या तरुणांकडून दीड ते अडीच लाखांपर्यंत रक्कम उकळली. त्यांना वर्क व्हिसा दिला नाही. त्यामुळे ट्रॅव्हल व्हिसा संपल्यावर मलेशियन पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षाही सुनावली.
या प्रकरणात गुरुनाथ कुंभार यांचे नातेवाईक नामदेव कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीत कौस्तुभ पवारने नोकरी लावण्याचे आमिष दाखवल्याचे म्हटले होते. तर धीरज हा त्याचा साथीदार होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत धीरज हाच या फसवणुकीमागचा मास्टरमाईंड असल्याचे समोर येत आहे.

धीरजचे मलेशियात कनेक्‍शन होते. त्याच्या ओळखीने मलेशियात तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचे काम हे दोघे करत होते का? याचा तपास पोलिस करत आहेत. कौस्तुभ पवार हा सध्या पोलिस कोठडीत आहे. कौस्तुभ कऱ्हाड येथील साईसम्राट हॉटेल मॅनेजमेंट कोर्स येथे शिक्षक म्हणून काम करत होता. तेथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना मलेशियात नोकरीस लावतो, म्हणून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होता आणि धीरज पाटीलच्या मलेशियातील ओळखीने तरुणांना नोकरी लावून देण्यासाठी तेथे ट्रॅव्हल व्हिसावर पाठवत होते. मा, त्यांना वर्क व्हिसा मिळत नव्हता. त्यामुळे चौघा तरुणांना मलेशियन पोलिसांनी अटक केली, तर पाच जण भारतीय दूतावासात शरण आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com