शिक्षणसेवक सभेत ‘ढकलाढकली’

शिक्षणसेवक सभेत ‘ढकलाढकली’

सांगली - शिक्षणसेवक सोसायटीच्या आजच्या सर्वसाधारण सभेत लाभांशावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात टोकाचा गदारोळ पाहायला मिळाला. माईकसाठी एकमेकांची ढकलाढकल सुरू होती; तर काही सभासद ‘ढकलून’ आल्याची चर्चा होती. अर्धा टक्का लाभांश वाढविण्यासाठी सत्ताधाऱ्यांविरोधात एक तास जोरदार घोषणाबाजी झाली. अध्यक्षांनी गोंधळातच १३ टक्के लाभांश अखेर जाहीर केला. 

अध्यक्ष संताजी घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एकला सुरू झालेली सभा चारला संपली. आटपाडी शाखा बांधकामासाठी जागा खरेदीसाठीच्या विषयावरून मतभेदाला सुरवात झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेवर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी कमांड मिळविल्याने सलग दुसऱ्या वर्षी लाभांश वाढवावा लागला. सभासद प्रश्‍न विचारण्यासाठी व्यासपीठासमोर वारंवार येत होते. शिक्षक बॅंक आणि सॅलरी सहकारी सोसायटीतील गोंधळाच्या वाऱ्याची लागण शिक्षक सेवक सोसायटीत पाहायला मिळू लागली आहे. संस्थेसाठी ही धोक्‍याची घंटा मानली जाते.

विरोधी सभासद बजरंग संगपाळ, महावीर सौदत्ते, विकास पाटील, दत्ता पाटील, सुधाकर माने यांनी आटपाडी शाखा इमारत जागा, बांधकाम तसेच लाभांशासह अनेक विषय ताणून धरले. विरोधकांनी सभेत प्रत्येक मुद्‌द्‌यावर सत्ताधाऱ्यांना रोखले. बराच वेळ गदारोळ सुरू राहिला. अध्यक्ष श्री. घाडगे, मानद सचिव सुभाष पाटील यांनी आटपाडी शाखा इमारत जागा खरेदी विषयातील गेल्या वर्षीच्या इतिवृत्तातील शब्द बदलण्याचे मान्य केले. आटपाडी शाखा बांधकाम आणि जागाखरेदीच्या विषयाला पुन्हा सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊनच पुढील कार्यवाही करण्याचे ठरले. 

विषय वाचन करीत असतानाही विरोधी सभासद किरकोळ कारणांवरून सत्ताधाऱ्यांची वारंवार परीक्षा घेत होते. आणि सत्ताधारी संचालक विरोधकांना प्रश्‍नांच्या भडीमारासमोर काहीही बोलू शकत नव्हते. अध्यक्ष घाडगे यांनी १२.५ टक्के लाभांश जाहीर केला. त्यावर लाभांश समीकरण निधीतून रक्कम घेऊन १३ टक्‍क्‍यांची मागणी महावीर सौदत्ते, माने यांच्यासह विरोधकांनी गेली. त्यावर तासभर चर्चा झाली. या विषयावर तर विरोधी सभासदांनी केलेल्या घोषणा, वर्तणुकीने लाज वाटावी, अशी परिस्थिती होती. वारंवार १३ च्या घोषणा दिल्या जात होता. लाभांश समीकरण निधीतून गेल्या वर्षी ४० लाख आणि यंदा पुन्हा १८ लाख खर्चून अर्धा टक्के लाभांश वाढवून देऊ, असे अध्यक्षांनी अखेर जाहीर केले. 

शिक्षणसेवकच नव्हे, तर सर्वच संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी शुल्क ठरवून दिले आहे. तरीही लेखापरीक्षक नेमणूक आणि शुल्कावरूनही वारंवार गोंधळ झाला. अखेर सर्वांचे दरपत्रक पाहून कमी शुल्क आकारणाऱ्यांना संचालकांनी लेखापरीक्षक म्हणून नेमण्याचा ठराव झाला. संचालकांनी केलेल्या काही तरतुदी बदलण्याची मागणी सदस्यांनी केली. उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, संदीप पाटील, रवींद्र गवळी यांनी प्रश्‍नांना उत्तरे दिली. विठ्ठल मोहिते यांनी सभासदांना वार्षिक अहवालाबरोबर खातेउतारा देण्याची मागणी मान्य केली.

शिक्षणसेवकला ६.३६ कोटी नफा 
१५ ऑगस्टपासून कर्ज व्याजदरात अर्धा टक्के कपात
कारभाराबाबत एकाने ‘झोल... गोल...’वर केले मनोरंजन 
व्याजदर कपात, लाभांशवाढीबद्दल संचालकांचे अभिनंदन
काही सभासद म्हणायचे, नफा वाढला... आता लाभांशही वाढवा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com