सकाळ व रोटरीतर्फे मोफत योग शिबिर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

शनिवारी होणार प्रारंभ - विजयसिंहराजे पटवर्धन दरबार हॉल योग केंद्राकडून सहकार्य
सांगली - ‘सकाळ माध्यम समूह’, ‘रोटरी क्‍लब ऑफ सांगली’ यांच्या संयुक्‍त विद्यमाने आणि विजयसिंहराजे पटवर्धन दरबार हॉल योग केंद्र यांच्या सहकार्याने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित मोफत योग शिबिरास शनिवारी (ता. १७) प्रारंभ होत आहे. गणेशनगर येथील रोटरी क्‍लबच्या सभागृहात पाच दिवस हे शिबिर रोज सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत होणार आहे. हे शिबिर सर्वांसाठी खुले आहे.

शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी निवडक आसने प्राणायाम आदी योगाच्या विविध प्रकारांची माहिती देण्यात येणार आहे.

‘युनो’ ता. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात या दिवशी योगाचे महत्त्व सांगण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाते. निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचे असल्याचे हजारो वर्षांपासून सांगितले. योगामुळे विविध आजारांवर मात करता येते. मानवी शरीरात प्रभावी अशी स्वयं उपचार शक्ती आहेत. रोग प्रतिबंधक यंत्रणा आहे. मात्र, ही शक्ती टिकवण्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा आहे. यामुळे शरीरातील अवयवांची कार्यकक्षता वाढवून रक्तदाब, मधुमेह, हृदयाचा आघात कमी करता येतात. मज्जासंस्थेत संतुलन येते. 

त्यामुळे जगभरात योगाचा गेल्या दोन दशकात मोठ्या जोमाने प्रसार झाला. त्यामुळेच त्याला जगन्मान्यता मिळाली. योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला तर अनेक आजार दूर ठेवता येतात. त्यामुळे योगाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाने गेल्या वर्षीपासून योग दिनानिमित्त शिबिर घेण्याचा उपक्रम सुरू केला. 

यंदा रोटरी क्‍लब आणि दरबार हॉल योग केंद्राच्या सहकार्याने ता. १७ ते ता. २१ जूनपर्यंत पाच दिवसांचे शिबिर घेण्यात येणार आहे. योग विशारद बाळकृष्ण चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली दहा योग शिक्षक शिबिरात प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. या शिबिरात शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी निवडक आसने, प्राणायाम, क्रिया शिथीलीकरण, ध्यान धारणा, अध्यात्म साधना यांचा सहभाग आहे. या शिबिरात शहर परिसरातील संघटना, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबीरास रोटरी क्‍लबचे अध्यक्ष के. के. शहा व त्यांच्या टीमने सहकार्य केले आहे.