नागपुरच्या डॉ. मदन कापरे यांना डी. के. गोसावी पुरस्कार जाहीर

संतोष भिसे
बुधवार, 4 एप्रिल 2018

मिरज - नागपुरमधील प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉ. मदन कापरे यांना यंदाचा डॉ. डी. के. गोसावी स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. कापरे हे नागपुरमधील निती क्‍लिनीक्‍सचे संचालक आहेत. थॉयरॉईडच्या कर्करोगावरील ते तज्ञ आहेत

मिरज - नागपुरमधील प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉ. मदन कापरे यांना यंदाचा डॉ. डी. के. गोसावी स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. कापरे हे नागपुरमधील निती क्‍लिनीक्‍सचे संचालक आहेत. थॉयरॉईडच्या कर्करोगावरील ते तज्ञ आहेत. प्रख्यात वास्तुरचनाकार शिरीष बेरी यांच्या हस्ते रविवारी ( ता. 8 ) हा  पुरस्कार त्यांना प्रदान देण्यात येईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती कर्करोग इस्पितळाचे कार्यकारी संचालक डॉ शिशीर गोसावी यांनी दिली.

यावेळी प्रशासकीय संचालक डॉ. यशवंत तोरो, विकास गोसावी, विवेक कुलकर्णी उपस्थित होते. पुरस्काराचे यंदाचे सतरावे वर्ष आहे. सिद्धिविनायक इस्पितळाचे संस्थापक दिवंगत डॉ. डी. के. गोसावी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो. यापुर्वी देशभरातील अनेक कर्करोग तज्ञांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यामध्ये डॉ. प्रफुल्ल देसाई, सुरेश आडवाणी, मेमन चंडी, रमाकांत देशपांडे, अनिल डिक्रुझ, संजय ओक, जी. के. रथ आदींचा समावेश आहे. 

डॉ. गोसावी म्हणाले, रविवारी पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ कापरे यांचे व्याख्यान होईल. सांगली-मिरजेसह परिसरातील डॉक्‍टरांना दुर्मिळ अनुभव ऐकता येतील. थॉयरॉईड शस्त्रक्रियेचा इतिहास, शस्त्रक्रियेची तंत्रे, थॉयराईड गाठीवर उपचारांसाठी आण्विक औषधे याविषयी ते मार्गदर्शन करतील. 

Web Title: Sangli News Gosavi award to Dr. Madan Kapare