मानसिंगराव नाईक गट शिराळ्यात नं. १

मानसिंगराव नाईक गट शिराळ्यात नं. १

शिराळा -  शिराळा तालुक्‍यात झालेल्या ६० ग्रामपंचायतींत २२ ठिकाणी सरपंचपदाच्या माध्यमातून माजी आमदार मानसिंगराव नाईक, तर स्वबळावरील ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात आमदार शिवाजीराव नाईक नंबर १ असल्याने शिराळच्या राजकारणात नाईकांत  संघर्ष दिसून येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा विचार करता आघाडीने घवघवीत यश संपादन करून  पुन्हा एकवेळ शिराळ्यात आघाडीचे वर्चस्व सिद्ध केले. काही झाले तरी तालुक्‍यातील लोकांनी राजकीय मतमतांतरता ही शांततेत निवडणुका पार पाडल्याने तालुक्‍याचा आमदार या नात्याने सर्वांना बरोबरीने घेऊन विकासाला चालना देण्याचे आमदार नाईक यांनी जाहीर केले. पक्ष आणि सरपंच कोणाचा ह्या पेक्षा गावचा  विकास कसा होईल याकडे नूतन पदाधिकारी व नेत्यांनी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे.

प्रत्येक निवडणुकीत शिराळ्याची राजकीय समीकरणे  बदलत असतात. तीच स्थिती ह्या ग्रामपंचायत  निवडणुकीत झाली. पाहिल्या टप्प्यात तालुक्‍यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, सत्यजित देशमुख यांच्या कोकरूड व आमदार शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या चिखली गावचा समावेश आहे. 

तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समितीला काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती. नगरपंचायतीवेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सहा सदस्यांच्या माध्यमातून नगरपंचायतीत प्रवेश केला. काँग्रेसला आपले खाते ही खोलता आले नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने १७ ठिकाणी आघाडी केली. अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी सोयीनुसार काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी अशा सोयीनुसार आघाड्या केल्या. सक्षम  असेल त्या ठिकाणी स्वबळ व अडचणीच्या ठिकाणी आघाडी 
हा धर्म तिन्ही पक्षांनी पाळून निवडणुका लढवल्या.

मानसिंगराव नाईक गट
काळुंद्रे, किनरेवाडी, गवळेवाडी, मांगरूळ, पावलेवाडी, फुफीरे, शिराळे खुर्द, पुनवत, कणदूर, वाडीभागाई, सागाव, नाटोली, चिखली, उपवळे, लादेवाडी, मांगले, अंत्री खुर्द, पाडळेवाडी, करमाळे, औंढी, निगडी, बेलदारवाडी अशा २२ ठिकाणी सरपंचपद आहेत.

आमदार शिवाजीराव नाईक गट
मणदूर, गुढे, खुंदलापूर, नाठवडे, हत्तेगाव, खिरवडे, बिऊर, तडवळे, कापरी, कांदे, गिरजवडे, अंत्री बुद्रुक, पाडळी, प.त. शिराळा, शिवरवाडी, पाचुंब्री, टाकवे, भटवाडी. रेड, खेड अशा २० ठिकाणी सरपंच झाले आहेत.

सत्यजित देशमुख गट 
आरळा, सोनवडे, चरण, मोहरे, शेडगेवाडी, चिंचोली, कोकरूड, माळेवाडी, ढोलेवाडी, देववाडी, कोंडाईवाडी, धामवडे, वाकुर्डे खुर्द, भैरववाडी, घागरेवाडी, वाकाईवाडी, येळापूर अशा १७ गावात सरपंचपद मिळाले.

शिंदेवाडी रिक्त 
शिंदेवाडी येथे सरपंचपदासाठी उमेदवारच मिळाला नसल्याने पद रिक्‍त राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com