सांगलीत कबड्डीपटूची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सांगली - कबड्डीपटू शंकर गुरुलिंग नरगट्टी (वय 34) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

नरगट्टी जय मातृभूमी कबड्डी मंडळाचा खेळाडू होता. शंभरफुटी रस्त्यावर त्याची बेकरी आहे. सात वर्षांपूर्वी त्याने प्रेमसंबंधातून विवाहित महिलेशी विवाह केला होता. दुपारी घरात कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.