दुध भेसळ प्रकरण..खव्यासाठी कमी प्रतीच्‍या दुधाचा वापर

दुध भेसळ प्रकरण..खव्यासाठी कमी प्रतीच्‍या दुधाचा वापर

सांगली - दिवाळीच्या धामधुमीत एसटी स्थानकाच्या पार्सल ऑफिसमधून जप्त करण्यात आलेल्या सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या खव्यात कमी प्रतीचे दूध वापरले गेले होते. त्याचा अहवाल नुकताच अन्न प्रशासन विभागाला मिळाला. त्यानुसार खवा निर्मात्या कंपनीसह खरेदीदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खव्याची मोठी उलाढाल होते. त्यात बनावट खवा, कमी प्रतीचा खवा बाजारात येतो. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवा, धडक मोहीम राबवा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अन्न प्रशासनाने छापा टाकून एसटी बसमधून आलेला आणि पार्सल कार्यालयात ठेवलेला खवा, तसेच बर्फी जप्त केली. हा एकूण साठा सुमारे चार लाख रुपयांच्या घरात होता. अस्वच्छ पद्धतीने तो आणला गेला. एसटीने त्याची वाहतूक करता येत नाही; शिवाय सामान्य तापमानात तो साठवता येत नाही. हे सारे नियम धाब्यावर बसवले गेले होते. त्यामुळे त्याच्या अहवालाकडे लक्ष होते. त्यात कमी प्रतीचे दूध वापरले गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा मानदाप्रमाणे हा खवा नसल्याने निर्मिती कंपनीसह विक्रत्यांना दंडात्मक कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, डोर्ली (ता. तासगाव) येथील बनावट दूध प्रकरणात दुधाचा अहवाल मिळाला असून आता तो मान्यच नाही, असा युक्तिवाद करत बबन देशमुख याने अपील  केल्याचे सांगण्यात आले. त्यावर सुनावणीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com