कडेगावमध्ये दिवसा दत्त मंदिरात चोरी

कडेगावमध्ये दिवसा दत्त मंदिरात चोरी

कडेगाव - येथील श्री दत्त मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीच्या पादुका, मुकुट तसेच दानपेटीवरही डल्ला मारत २४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना आज दुपारी साडेबारा ते चारच्या दरम्यान घडली. याबाबत विश्‍वास हणमंतराव व्यास (रा. कडेगाव) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी, की येथे कोतमाई ओढ्यानजीक शहराच्या पश्‍चिमेला श्री दत्तमंदिर आहे. येथील मंदिरात आज दुपारी साडेबाराला आरती झाल्यानंतर पुजारी मंदिरातील दरवाजाला नेहमीप्रमाणे कुलूप लावून निघून गेले; तर मंदिर परिसरात आज दिवसभर लोकांची गर्दीही होती. तरीही काही चोरट्यांनी आज भरदिवसा येथील मंदिराच्या दरवाजाचे कुलूप एक्‍सा पानाने कापून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी येथील अडीचशे ग्रॅम वजनाच्या आठ हजार ५०० रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका व अडीचशे ग्रॅम वजनाचा आठ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरला. त्यानंतर तेथे असलेली कुलूपबंद दानपेटीचे टोपण कटावणीने उचकटून त्यातील सात हजार ५०० रुपये रोख रक्कम लंपास केली. उर्वरित नाणी व शंभर, पन्नास, वीस व दहाच्या नोटा दानपेटीत तशाच शिल्लक आहेत. दुपारी चारच्या सुमारास आप्पासाहेब चव्हाण (रा. कडेगाव) हे श्रीदत्त दर्शनासाठी मंदिरात गेले असता येथील चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी नागरिकांना बोलावून मंदिरात झालेल्या चोरीची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com