सत्ताधारी काँग्रेस गटनेत्यानेच भिरकावला महापौरांवर भर सभेत माईक

विजय पाटील
शुक्रवार, 25 मे 2018

सांगली - महापालिकेच्या महासभेत आज सत्ताधारी काँग्रेस महापौरांवर काँग्रेच्याच गटनेत्याने माईक भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. भर महासभेत गटनेते व माजी महापौर किशोर जामदार यांनी यावेळी हातातील माईक भिरकावत राजदंडही पाळवण्याचे प्रकार केला.यामुळे सभेत जोरदार गोंधळ निर्माण झाला होता. 

सांगली - महापालिकेच्या महासभेत आज सत्ताधारी काँग्रेस महापौरांवर काँग्रेच्याच गटनेत्याने माईक भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. भर महासभेत गटनेते व माजी महापौर किशोर जामदार यांनी यावेळी हातातील माईक भिरकावत राजदंडही पाळवण्याचे प्रकार केला.यामुळे सभेत जोरदार गोंधळ निर्माण झाला होता. 

सांगली महापालिकेच्या आज पार पडलेल्या महासभेत सत्ताधारी काँग्रेस नेत्यांनीच जोरदार गोंधळ घातला आहे. मिरज अमृत योजनेच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. यावेळी शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवक आमनेसामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. यावेळी संतप्त झालेल्या महापालिकेचे सभागृह नेते किशोर जामदार यांनी आपल्या हातातील माईक महापौरांच्या दिशेने भिरकावला आणि महापौरांच्या समोरील राजदंडही सभागृह नेत्यांनी उचलला. यामुळे सांगली महापालिका सभेत चांगलेच वातावरण तापले होते.

सभा सुरू असताना सेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी अमृत योजनेच्या विषयावरून सत्ताधारी काँग्रेसला टीकेचे लक्ष बनवले. यावेळी शेखर माने यांच्या आरोपामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांनी माने यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत शब्द मागे घेणेची मागणी केली.

यावेळी चर्चेतून वाद वाढल्याने सभागृह नेते किशोर जामदार यांनी आपल्या हातातील माईक महापौरांच्या पिठासनाकडे भिरकावला आणि महापौरांच्या समोरील राजदंडही उचलला. यावेळी राजदंड उचलणे आणि सभागृहात माईक फेकून मारणे याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी केली यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला.

मिरजेची पाणी पुरवठा योजना पूर्ण व्हावी हीच भूमिका आम्ही मांडली. यावर सत्ताधारी गटानेच गोंधळ घातला. या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी तसेच सभा गुंडाळण्यासाठी हा प्रकार केला आहे. तो आम्ही हाणून पाडला आहे. भविष्यामध्ये हायकोर्टात पिटीशन दाखल आहे. त्यामध्येही आमची भूमिका हीच राहील. योजना वाढीव दराचा डाव हाणून पाडण्यात येईल. 
- शेखर माने,
शिवसेना नगरसेवक

Web Title: Sangli News Sangli Palika general body meeting