आटपाडी तालुक्यात आगीत दुकान खाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

दिघंची - आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे दत्तात्रय तुकाराम शिरकांडे यांचे किराणास शाॅर्टसर्किटने आग लागली. त्यात त्यांचे दुकान जळून खाक झाले.  

दिघंची - आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे दत्तात्रय तुकाराम शिरकांडे यांचे किराणास शाॅर्टसर्किटने आग लागली. त्यात त्यांचे दुकान जळून खाक झाले. अंदाजे तीन लाख रूपयाचे नुकसान झाले.

दिवाळी असल्याने दत्तात्रय शिरकांडे यानी आपल्या दुकानात माल भरला होता . शुक्रवारी दुपारी त्यांच्या दुकानास शाॅर्टसर्किटने आग लागली. आगीवर आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा मारा केला,परंतु किराना माल, व ज्वलनशील पदार्थांमुळे आग पसरली.

सदर घटनेची माहिती मिळताच शासकीय पातळीवर पंचनामा करण्यात आला. ऐन दिवाळीत शिरकांडे यांचे नुकसान झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.