निगडी खुर्द येथील जवानाचे उपचारादरम्यान निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्‍यातील निगडीखुर्दचे जवान अजित नारायण काशीद यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना डोकमल सेक्‍टर कुपुक येथे त्यांचा 17 सप्टेंबरला अपघात झाला होता. लष्करी इस्पितळात उपचार सुरू असताना सोमवारी (ता. 25) त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणण्यात येणार असून, उद्या (ता. 27) त्यांच्या मूळ गावी निगडी खुर्दला पोहचेल. त्यानंतर त्यांच्यावर तेथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.