निधी तरतुदीवरून स्थायी सभा तहकूब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

सांगली - अंदाजपत्रकात तरतूद नाकारलेल्या सुमारे दहा कोटींच्या विकासकामांना प्रशासनाने खो घातल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी आज स्थायी समितीचे कामकाज बंद पाडले. प्रशासनाने यावर तातडीने मार्ग काढल्याशिवाय सभाच पुढे सुरू होऊ न देण्याचा पवित्रा घेतला. सभापती संगीता हारगे यांनी सभा दोन तासांसाठी तहकूब ठेवली. त्यानंतर मुख्य लेखा अधिकारी विद्यारत्न काकडे यांनी संबंधित कामांच्या फायलींवर अन्य लेखाशीर्षावरून निधी वर्ग केला जाईल, असा शेरा मारण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तहकूब सभा पुढे सुरू झाली. 

नगरसेवकांना प्रत्येकी पंचवीस लाखांचा स्वनिधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून ते तातडीची विकास कामे प्रस्तावित करू शकतात. तशा फायली गतवर्षीपासून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. तथापि अनेक नगरसेवकांचा हा निधी पूर्णपणे खर्च होऊ शकला नाही. असा अखर्चित निधी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद न करता परस्पर वर्ग करण्यात आला. त्यामुळे या मंजूर कामांच्या पूर्ततेवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. 

अंदाजपत्रकात तरतूदच नसल्याने ठेकेदारांनी ही कामे करण्यास नकार दिला. महापालिका क्षेत्रात सुमारे १० कोटींची अशी कामे आहेत. ही कामे करणार, असे नगरसेवकांनी नागरिकांना सांगितले आहे. आता ही कामे न झाल्यास कोणत्या तोंडाने निवडणुकांना सामोरे जाणार, असा सवाल सर्वच सदस्यांनी सभापतींना केला. शिवराज बोळाज, निर्मला जगदाळे, प्रदीप पाटील, संतोष पाटील, दिलीप पाटील 

अशा सर्वच सदस्यांनी प्रशासनावर सरबत्ती केली. यातून मार्ग काढा, अन्यथा सभाच नको, असा पवित्रा घेतला. 

सभापतींनी दोन तासांसाठी सभा तहकूब ठेवल्यानंतर बहुतेक सदस्य वैयक्तिक कामांसाठी बाहेर पडले. दोन तासांनी ते पुन्हा परतले. पुन्हा मागून पुढे चर्चा सुरू झाली. ही कामे पूर्ण होण्यासाठी अन्य लेखाशीर्षावरून निधी वर्ग करण्यात येईल, असा शेरा मारण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानंतर अजेंड्यावर सभा सुरू झाली. त्यानंतर मात्र सभा विनाअडथळा आटोपली. अजेंड्यावरील विषयांना किरकोळ बदल करून  मान्यता दिली.

Web Title: sangli news Standing Committee Meeting