सदाभाऊ...मोर्चा येऊ दे, सामोरा जाईन! - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

सांगली - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे केवळ मंत्री नाहीत, ते एका संघटनेचे महान नेते आहेत. त्यांना माझ्या घरावर मोर्चा काढण्याचा लोकशाहीत अधिकार आहे, असा पलटवार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केला. 

‘सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढा. मी तुमचा सत्कार करीन,’ असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माळशिरस तालुक्‍यातील गोरडवाडी येथे रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत केले होते. सहकारमंत्री श्री. देशमुख यांना छेडले असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व (स्व.) गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे सहकारतपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर श्री. देशमुख बोलत होते. लोकांसमोर बोलताना सरकारमध्ये आपण केलेल्या कामांची बढाई मारता-मारता सदाभाऊंनी मोर्चा थेट सहकारमंत्र्यांकडे वळविला आहे.

दोन साखर कारखान्यांतील अंतर कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आदेश सदाभाऊंनी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिला. पण, राज्यमंत्री एवढ्यावर थांबले नाहीत. ‘मोर्चा काढला तर मी तुमचा सत्कार करेन’, असे सांगायला विसरले. सरकारमध्ये असूनही हे बोलतोय, याचे भान असल्याचेही श्री. खोत म्हणाले होते.