‘सागरेश्वरा’त होणार वाघांचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

देवराष्ट्रे - सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन्यजीव विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले आणि हरणांचे माहेरघर असणारे सागरेश्वर अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे.

देवराष्ट्रे - सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन्यजीव विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले आणि हरणांचे माहेरघर असणारे सागरेश्वर अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे. तरी देशातील एकमेव मानवनिर्मित असणारे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात लवकरच वाघांची जोडी सोडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विभागीय वनाधिकारी विजय खेडकर यांनी दिली.

जंगलात वाघ असणे हे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जंगलात असणाऱ्या अन्नसाखळीमधील वाघ हा महत्त्वाचा भाग आहे. सागरेश्वर अभयारण्य हे सह्याद्रीच्या डोंगररांगेत आहे व सह्याद्रीच्या डोंगररांगेत वाघांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर सागरेश्वर अभयारण्यात वाघांची जोडी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

सागरेश्वर अभयारण्याचा विस्तार एक हजार चौरस किलोमीटर इतका आहे. सागरेश्वर अभयारण्य हरणासाठी प्रसिद्ध आहे. हरणाच्या विविध जाती या अभयारण्यात आढळतात. हरणांच्या, चितळ, सांबर, काळवीट या जातीसह रानडुक्कर, ससे, कोल्हे, लांडगा आदी प्राणी आढळतात. वाघ हा नरभक्षक प्राणी असून वाघांचे आवश्‍यक खाद्य या अभयारण्यात उपलब्ध आहे. त्याचबरोबर अभयारण्यातील पर्यटन वाढीसाठीही याचा उपयोग होणार आहे.

Web Title: Sangli News Tiger conservation project in Sagareshwar Sanctuary