वीजेचा धक्का बसून सांगली जिल्ह्यात दोन ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सांगली - जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या घटनांच वीजेचा धक्का लागून दोघे ठार झाले. एक महिला तर एका युवकाचा त्यात समावेश आहे. 

सांगली - जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या घटनांच वीजेचा धक्का लागून दोघे ठार झाले. एक महिला तर एका युवकाचा त्यात समावेश आहे. 

मोटारीचा धक्का लागू वांगी येथे तरूण ठार 

वांगी (जि. सांगली) - येथे राहुल आदिकराव जंगम (वय 22) हे आज दुपारी घराच्या बांधकामावर पाण्यासाठी वापरली जाणाऱ्या मोटार दुरुस्त करत होते. त्यावेळी त्याेंना वीजेचा धक्का लागला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चिंचणी पोलिसात या घटनेची नोंद आहे. शवविच्छेदनानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर तपास करीत आहेत. 

कुंडलला वीजेच्या धक्‍क्‍याने महिला ठार 

कुंडल (जि. सांगली) - येथील पार्वती सचिन गेजगे (वय 24, क्रांतीनगर) ही महिला पहाटेच्या सुमारास वीजेचा धक्का लागून ठार झाली. कुंडल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, की पार्वती गेजगे कुंडल येथे राहतात.. पहाटे अडिचच्या सुमारास भिंतीजवळ वीजप्रवाह सुरू असणारी वायर तुटून पडली होती. वायरला स्पर्श झाल्याने  त्यांना धक्का बसला त्यातच ती ठार झाली. तिचे वडील मारूती चंद्राप्पा आजमाने यांनी कुंडल पोलीसात याची फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील तपास करीत आहेत.