पाण्यासाठी खासदारकी पणाला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कवठेमहांकाळ - येत्या सहा-सात महिन्यांत तालुक्‍यातील पाणीप्रश्न निकालात काढण्यासाठी आपली खासदारकी पणाला लावली जाईल. त्याचबरोबर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी ताकदीने  भाजपचा झेंडा फडकावा, असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

कवठेमहांकाळ - येत्या सहा-सात महिन्यांत तालुक्‍यातील पाणीप्रश्न निकालात काढण्यासाठी आपली खासदारकी पणाला लावली जाईल. त्याचबरोबर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी ताकदीने  भाजपचा झेंडा फडकावा, असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

जत रोडवरील दुय्यम बाजार समितीच्या सभागृहात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. खासदार पाटील यांनी प्रारंभी तालुक्‍यातील विविध गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. बैठकीस जिल्हा बॅंकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, माजी सभापती वैशाली पाटील, माजी उपसभापती अनिल शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल लोंढे, दुय्यम बाजार समिती सभापती दादासाहेब कोळेकर, हायुम सावनूरकर, महादेव सूर्यवंशी, नंदकुमार घाडगे यांची प्रमुख  उपस्थिती होती.

खासदार पाटील म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील पाणीप्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपण तालुक्‍यातील म्हैसाळ व टेंभू योजनेच्या कामासाठी सातत्याने  पाठपुरावा करत कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत.  त्याचबरोबरच येत्या सहा-सात महिन्यांत टेंभू योजनेची सर्वच कामे पूर्ण होतील. घाटमाथ्याचाही पाणीप्रश्न लवकरच निकालात निघेल, असा विश्वास देत म्हैसाळ योजनेसाठी भरीव निधी मिळाल्याचेही सांगितले.

 बैठकीस शिरढोणचे संजय पाटील, खरशिंगचे सुहास पाटील, प्रशांत कदम, रांजणीचे माजी पंचायत समिती सदस्य पतंग यमगर, बंटी भोसले, उदय भोसले, काकासाहेब आठवले, कुणाल कोठावळे, कुचीचे लक्ष्मण पवार, प्रा. राजाराम पाटील, रंजनीकांत पाटील, औंदुबर पाटील यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  आभार तालुकाध्यक्ष अनिल लोंढे यांनी मानले.