कवठेमहांकाळ तालुक्‍यात ६३ टॅंकर सुरू

गोरख चव्हाण
रविवार, 3 सप्टेंबर 2017

कवठेमहांकाळ - सातत्याने पावसाने दिलेली ओढ... अकरापैकी काही तलावांत अल्प पाणीसाठा... वाया जाणारे हंगाम... आदींमुळे कवठेमहांकाळ तालुका पुन्हा एकदा दुष्काळच्या दृष्टचक्रात सापडत आहे. एकीकडे म्हैसाळ योजनेने तालुक्‍यातील काही भाग ओलिताखाली आला असला तरी टेंभू योजनेमुळे पूर्व भागाचा काही अंशी पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत झाली  आहे. तालुक्‍यात ६८ ठिकाणी टॅंकरखेपा मंजूर असून, त्यातील ६३ टॅंकरद्वारे ४६ हजार लोकांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्‍यातील अकरा तलाव योजनेच्या पाण्याने भरल्यास तालुका पाणीप्रश्‍नातून सुटण्यास मदत होणार आहे, परंतु याबाबत कोणीच काही बोलत नसल्याचे चित्र आहे.

तालुक्‍यातील साठ गावांत शेती प्रमुख व्यवसाय असून, शेतीबरोबरच पशुपालन केले जाते. तालुक्‍यात अकरा लघु व मध्यम तलाव असून, यातील काही तलावांत गेले काही वर्षे पाणी नसल्याने ते  मृतसंचय अवस्थेत आहेत. काही तलावांत गाळ साचून झाडे झुडपे उगवल्याने पाणीक्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. एकीकडे तलावच मृतसंचय अवस्थेत असल्याने दुसरीकडे पावसानेही ओढ दिली आहे. तालुक्‍यात द्राक्षबागा व डाळिंबाबरोबरच ऊस पिकांचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्‍यात म्हैसाळ व टेंभू योजना तसेच बनेवाडी आणि आगळगाव उपसा सिंचन योजना आहेत. यातील काही सिंचन योजनेची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून याबाबत नेहमीच चर्चा उद्‌घाटने घोषणा केल्या जातात. मात्र कामे काही सुरू होत नाहीत. शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. तालुका टॅंकरमुक्‍त करण्यासाठी सिंचन योजनाची कामे पूर्ण होणे आवश्‍यक आहे. तसेच तलाव योजनेच्या पाण्याने भरल्यास पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. परंतु तालुक्‍यातील राजकारण हे नेहमीच पाणीप्रश्‍नाभोवती फिरताना दिसते. शासनाने सुरू केलेल्या जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत काही गावांची निवड झाली आहे. गतवर्षी निवड झालेल्या गावातही योजनेची कामे झाली आहेत. 

तालुक्‍यातील २५ गावे व १४० वाड्यावस्त्यांवरील ४६७९८ नागरिकांना टॅंकरने पिण्याचा पुरवठा केला जात आहे. ६८ मंजूर खेपापैकी ६३ टॅंकरने पाणी दिले जात असून तेरा विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. केवळ निवडणुकांत पाणीप्रश्‍नाचा मुद्दा गाजतो; परंतु निवडणुका पार पडल्या की पाणीप्रश्‍नचा मुद्दा बाजूला राहताना दिसतो. ज्या गावात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे त्यातील काही गावे ढालगाव, घाटनांद्रे, रांजणी परिसरातील आहेत.