सुपारी देऊन केला पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

पाच जणांना अटक - दुधगावातील खुनाचे गूढ उकलले

सांगली - दूधगाव (ता. मिरज) येथील गीतांजली उत्तम मोरे (वय ३८) या महिलेचा चार दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले. पतीनेच सुपारी देऊन कवठेपिरानच्या तिघांकडून तिचा खून केला. या प्रकरणी पतीच्या मामेभावासह पाचजणांना अटक केली. त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

पाच जणांना अटक - दुधगावातील खुनाचे गूढ उकलले

सांगली - दूधगाव (ता. मिरज) येथील गीतांजली उत्तम मोरे (वय ३८) या महिलेचा चार दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले. पतीनेच सुपारी देऊन कवठेपिरानच्या तिघांकडून तिचा खून केला. या प्रकरणी पतीच्या मामेभावासह पाचजणांना अटक केली. त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

दूधगाव येथे गीतांजलीचा गळा दाबून आणि चाकूचे वार करून निर्घृण खून झाला. मुलगी शाळेत गेल्यावर सकाळी साडेसात ते साडेआठ या काळात ही घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या वडिलांनी फिर्याद दिली. पोलिस उपाधीक्षक दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेतील विविध कंगोरे तपासून अखेर महिलेच्या पतीनेच तिचा सुपारी देऊन खून केल्याचे स्पष्ट झाले. पती उत्तम वसंत मोरे (वय ४१, तावदरकरवाडा, कवलापूर), आशिष संजय केरिपाळे (वय २१, कवठेपिरान), सचिन बाबासाहेब चव्हाण (वय २७, कवठेपिरान), गणेश भगवान आवळे (वय २५, कवठेपिरान) आणि नामदेव गणपती तावदरकर (वय ४४, तावदरकरवाडा, कवलापूर) या पाच जणांना अटक केली. तपासाची माहिती उपाधीक्षक काळे आणि निरीक्षक डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिलेचे गेल्या ७-८ वर्षांपासून पतीशी पटत नव्हते. दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी तिने पती, दीर सुनील आणि इतरांविरुद्ध घरातून दळण कांडप मशिनची मोटार चोरून विकल्याची फिर्याद दिली होती. पतीनेही तिच्याविरुध्द तक्रार दिली होती. यावरुन पतीवरच पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते.

कट रचून खून
पत्नीने मालमत्तेवर केलेला ताबा, आई-वडिलांसह घरातून 
बाहेर काढल्याने पती उत्तम मोरेने पत्नीचा काटा काढण्याचे ठरवले. मामेभाऊ नामदेव तावदरकरसह गीतांजलीच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी कवठेपिरानमधील आशिष केरीपाळे, सचिन चव्हाण आणि गणेश आवळे यांना खुनाची सुपारी दिली. दोन लाख रुपये देण्याचे ठरले. काही रक्कमही दिलीही. आठ दिवसापूर्वी नामदेव तावदरकरने घर दाखवून माहिती दिली.

सकाळीच काढला काटा
शनिवारी सकाळी मुलगी शाळेत गेल्यावर तिघे महिलेच्या घरी गेले. तिच्या घरी मोठ्या आवाजात एफएम रेडिओ सुरू होता. तिच्या दीराकडून पैसे येणे आहेत, असे सांगून ते घरात घुसले. दार लावून तिच्यावर हल्ला केला. प्रथम गळा वायरने आवळला. नंतर गळ्यावर चाकूने वार केले.