कऱहाडमध्ये कृष्णेच्या पुरात महिलेची आत्महत्या?

सचिन शिंदे
सोमवार, 24 जुलै 2017

अंदाजे तीस वर्षाच्या महिलेने कऱ्हाडच्या कृष्णा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारली. आज (सोमवार) भर दुपारी दीडच्या सुमारास घटना घडली. 

कऱहाड : कृष्णा नदीच्या महापुरात उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) दुपारी येथे घडली. संबंधित महिलेचे वय अंदाजे तीस वर्षे आहे. तिने पुलावरून कृष्णेच्या पुरात उडी मारली. 

भर दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी पुलावरून रहदारी सुरू होती. घटनेची माहिती समजताच पोलिस व अग्निशामक दल मदतीसाठी दाखल झाले. मात्र कृष्णा नदीचा प्रवाह जोरात असल्याने महिला वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी सांगितले.

काॅलेज युवकापासून दहा फुट अंतरापासून घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली. महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. तिची चप्पल वगळता अन्य काहीच पुरावा पुलावर उपलब्ध नव्हता.