आटपाडी-मुंबई एसटीला अपघात; 8 जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

आटपाडीहून मुंबईकडे जात असलेली एसटी बस आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास माणगंगा नदीच्या पात्रात कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सातारा : दहिवडीजवळ (ता. माण) फलटण रस्त्यावर माणगंगा नदीच्या पुलावरुन आटपाडी-मुंबई बस सुमारे वीस फूट खाली कोसळली. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडीहून मुंबईकडे जात असलेली एसटी बस आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास माणगंगा नदीच्या पात्रात कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये १५-२० प्रवासी होते. आठ जण जखमी असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी चौघांना सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर किरकोळ जखमींवर दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: