कऱ्हाड: उंब्रजला भिम-कुंती उत्सव मोठ्या उत्साहात पार

सचिन शिंदे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

'भिमसेन महाराज की जय'  'कुंती माता की जय'  जयघोषणांनी उंब्रज परिसर दुमदुमुन गेला होता. उंब्रज (ता. कऱ्हाड) शेकडो वर्षापासून भीम-कुंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे बेंदरापासून  उत्सव सुरू होतो. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी उत्सवाचा मुख्य दिवस असतो.

कऱ्हाड : गुलाल खोबऱयाची उधळण व फळांचा वर्षाव करत शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या भिम-कुंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

'भिमसेन महाराज की जय'  'कुंती माता की जय'  जयघोषणांनी उंब्रज परिसर दुमदुमुन गेला होता. उंब्रज (ता. कऱ्हाड) शेकडो वर्षापासून भीम-कुंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे बेंदरापासून  उत्सव सुरू होतो. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी उत्सवाचा मुख्य दिवस असतो. त्यानुसार आज (सोमवारी) भीम-कुंती उत्सव पार पडला. त्यांची भेट उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. मुख्य दिवशी सकाळपासूनच भिमसेन मंडळासह ग्रामस्थांची लगबग सुरु होती.

सकाळी भीम मंडपात मिरवणुकीवेळी कुंती मातेच्या शेजारी बसण्याच्या मानासाठी बोली पद्दतीने लिलाव झाला. यावेळी लिलाव बोलीत अनेकांनी सहभाग घेतला होता. तर यंदा हा मान २६ हजार ५५१ रुपयाची सर्वाधिक बोली करत प्रमोदकुमार मोहनलाल शहा रा. उंब्रज  यांनी घेतला. दुपारी अडीचच्या सुमारास राजेंद्र महामुनी यांच्या घरी असणा-या कुंती मातेच्या मुर्तीस घेऊन रथात विराजमान केले त्यानंतर मिरवणुक सुरू झाली. यंदाचे मानकरी प्रमोदकुमार शाह कुंतीमातेच्या मुर्तीस रथात घेऊन विराजमान झाले होते. वाद्य वृंद पथक होते. अग्रभागी बॅंड पथक होते. कुंती मातेची मिरवणुक महामुनी यांच्या घरापासुन चावडीचौकातून मुख्य रस्त्याने बाजारपेठेत आली.

बाजापेठेतून सेवा रस्त्यावरून पुढे पाटण तिकाटणे मार्गे मिरवणुक कॉलेज रस्त्याला असणा-या मारुती मंदीराला वळसा घालून पुन्हा बाजारपेठेच्या दिशेने वारकरी भावीकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पुन्हा मंडपात आली. त्यानंतर सांयकाळच्या सुमारास माता कुंती व पुत्र भीम यांच्या भेटीचा अनोखा सोहळा पार पडला. हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. यावळी मानक-यांच्या हस्ते विधिवत पुजा झाली. त्यानंतर कुंती मातेस अर्पण करण्यात आलेल्या वस्तुंचा लिलाव झाला. त्यास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.  बाजारपेठ गर्दीने फुलुन गेली होती. 

टॅग्स