सातारा: बंधाऱ्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

राजेश पाटील
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

वाल्मिकी पठारवरील तामीणे (ता. पाटण) येथील गावात दुर्घटना घडली. दीपक आत्माराम माने (वय १९) असे संबधित युवकाचे नाव आहे. तो युवक नोकरी निमित्त मुंबईत असतो गणेशोत्सवासाठी तो येथे आला होता. त्यावेळी दुर्घटना घडली.

ढेबेवाडी (ता. पाटण, जि. सातारा) : गणेश मुर्ती विसर्जन करताना बंधाऱ्यात बुडालेल्या युवकाचा तब्बल १६ तासांनी मृतदेह सापडला.

वाल्मिकी पठारवरील तामीणे (ता. पाटण) येथील गावात दुर्घटना घडली. दीपक आत्माराम माने (वय १९) असे संबधित युवकाचे नाव आहे. तो युवक नोकरी निमित्त मुंबईत असतो गणेशोत्सवासाठी तो येथे आला होता. त्यावेळी दुर्घटना घडली. गुरूवारी सायंकाळी सहा वाजता कुटूंबिया समवेत तो येथील बंधाऱ्यात गणेश विर्सजनासाठी आला होता. त्याला बंधाऱ्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.

कुटूंबिय व गावकऱ्या देखत घटना घडली. त्यामुऴे तेथील लोकांनी त्वरीत त्याची माहिती पोलिसात दिली. घटनेनंतर तब्बव सोळा तास त्याची शोध मोहिम सुरू होती. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.