आरोग्य केंद्रातील लिपिक लाचप्रकरणी जाळ्यात 

आरोग्य केंद्रातील लिपिक लाचप्रकरणी जाळ्यात 

सातारा - दप्तर तपासणीच्या नावाखाली आरोग्य सेविकेकडे 850 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी बामणोली (ता. जावळी) येथील आरोग्य केंद्राच्या लिपिकावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 

साहेब नागनाथ नागुलवाड (मूळ रा. गुणीपूर, ता. उमरी, जि. नांदेड, सध्या रा. श्री व सौ अपार्टमेंट शेजारी, शाहूनगर, सातारा) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार महिला ही बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका आहे. या आरोग्य केंद्राची ऑगस्ट महिन्यात दप्तर तपासणी झाली. या दप्तर तपासणीच्या नावाखाली तो संबंधित महिलेकडे 850 रुपये मागत होता. त्याबाबत महिलेने 19 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. त्याच्या आधारे 27 सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये त्याने "प्रत्येकाने 900 रुपये दिले आहेत. तुम्ही 850 द्या,' असे नागुलवाड म्हणाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर आज मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आरिफा मुल्ला, बयाजीराव कुरळे, हवालदार संभाजी बनसोडे, भरत शिंदे, आनंदराव सपकाळ, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, अजित कर्णे, विनोद राजे, संभाजी काटकर, विशाल खरात, महिला हवालदार मधुमती कुंभार, नीलिमा जमदाडे, श्रद्धा माने यांचा सहभाग होता. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. नाडगौडा यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com