कऱ्हाड: घरफोड्या करणारी तिघांची टोळी गडाआड

सचिन शिंदे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

विद्यानगर भागातून मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात फोन आला. गुरूदत्त काॅलनी येथे चोरटे आले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी रात्रगस्त घालणारे फौजदार दिपीका जौंजाळ, हवालदार जयसिंग राजगीर, सतीश जाधव, गणेश राठोड, गणेश कुंदे आदी घटनास्थळी पोचले. त्यावेळी चोरटे अंधराचा फायदा घेवून शेतात पळाल्याचे त्यांना नागरीकांनी सांगितले.

कऱ्हाड  ः घरफोड्या व वाहन चोऱ्या करणारी तिघांची टोळी पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केली. त्या टोळीकडे दिवसभर चौकशी सुरू होती. भागातील अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होईल. 

विद्यानगर भागातून मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात फोन आला. गुरूदत्त काॅलनी येथे चोरटे आले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी रात्रगस्त घालणारे फौजदार दिपीका जौंजाळ, हवालदार जयसिंग राजगीर, सतीश जाधव, गणेश राठोड, गणेश कुंदे आदी घटनास्थळी पोचले. त्यावेळी चोरटे अंधराचा फायदा घेवून शेतात पळाल्याचे त्यांना नागरीकांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी चिखलातून पाठलाग केला. अर्धा किलोमीटर लांब पाठलाग केल्यानंतर पोलिसांना त्या भागाला वेढा टाकला. त्यावेळी दोघेजण आॅन दी स्पाॅट सापडले. त्यांचा एक साथीदारही पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतला.

पोलिसांना तिघांकडे आज दिवसबर कसून चौकशी केली. त्यांच्याकडून काही चोऱ्यांची माहिती हाती आली आहे. मात्र त्याबाबत पोलिसांनी गोपनीयता ठेवली आहे. त्या टोळीकडून काही दुचाकीही जप्त झाल्या आहेत. काही घरफोड्याही उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याचीही सविस्तर चौकशी करून उद्या रितसर माहिती देण्यात येईल, असे पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे व पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Web Title: Satara news crime in karhad