कऱ्हाड: ओळख परडे होण्यापूर्वीच गुन्हेगारांची छायाचित्रे सोशल मिडीयावर

सचिन शिंदे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

रात्रीपासून ती छायाचित्रे फिरत आहेत. त्या संशयीतांची पोलिसांनी गोपनीय पद्धतीने काढलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. ती कोणी व्हायरल केली, त्याबाबात चौकशी करण्यात होणार आहे. संशयीतांची ओळख परेड होण्यापर्वीच आयडेंटी साईज छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या ओळख परेडवर पाणी पसरल्याचे दिसते.

कऱ्हाड : हवेत गोळीबार करून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील संशयितांची ओळख परेड घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडी घेतली. मात्र त्यांची ओळख परेड होण्यापूर्वीच संबधित संशयितांची आयकार्ड साईज छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यामुळे एकच पोलिसांच्या वर्तळासह शहरात खळबळ उडाली आहे.

छायाचित्रेच व्हायरल झाल्याने पोलिस घेणाऱ्या ओळख परेडवर पाणी पसरल्याचे दिसते. वडगाव हवेली येथील पेट्रोलपंपावर हवेत गोळीबार करत दरोडा टाकणाऱ्या पाच जणांची टोळी गजाआड केली. त्यातील अन्य एक फरार आहे. अटकपैकी एक अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याची रवानगी बाल न्यायलयात केली आहे. परवा रात्रीच्या दरोड्यानंतर अवघ्या काही तासात टोळीला अटक झाली आहे. शहर व तालुका पोलिसांनी सयुंक्त कारवाई केली.

दरोडेखोरांची टोळीकडून 30 हजांराची रोकड, पिस्तल, चाकू, तलवार व दोन बुलेट जप्त आहे. अटकेतील चौघेजण हरीयाणा येथील आहेत. इश्वर राजकुमार सैनी (वय 21), महेंद्र सुर्यग्यान गुजर (20), दीपक राजकुमार गर्ग (25), अनमोल जीवनसिंग शर्मा (22, चौघे रा. हरियाणा), अक्षय भरत कावरे (21, रा. अपशिंगे, ता. कडेगाव) अशी त्यांची आहेत. संबधितांनी वडगाव हवेली येथील दत्त पेट्रोलपंप लुटला. त्यावेळी दोन बलेटवरून तिबलशीट आले. त्यांनी हवेत गोळीबार केला. लूटीनंतर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत ते सापडले. त्या चोघांना फौजदारी न्यायालयात नेण्यात आले. तेथे त्यांनी संशयीतांची ओळख परेड व्हावी, यासाठी न्यायालयात न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार ती देण्यातही आली. मात्र त्यांची ओळख परेड होण्यापूर्वीच त्याची आयकार्ड साईज छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत.

रात्रीपासून ती छायाचित्रे फिरत आहेत. त्या संशयीतांची पोलिसांनी गोपनीय पद्धतीने काढलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. ती कोणी व्हायरल केली, त्याबाबात चौकशी करण्यात होणार आहे. संशयीतांची ओळख परेड होण्यापर्वीच आयडेंटी साईज छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या ओळख परेडवर पाणी पसरल्याचे दिसते. पोलिसांच्या वर्तुळात त्याची जोरदार चर्चा आहे. पोलिस उपाधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी ती छायाचित्रे व्हायरल कशी झाली, याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स

पश्चिम महाराष्ट्र

हुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची...

02.00 PM

अकोले : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू...

01.24 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रोहम वस्तीवर राहणारे शेतकरी कैलास चत्तर यांच्या विहिरीत तीन महिन्याच...

12.42 PM