डेंगीचे रुग्ण आढळल्याने सर्वेक्षण मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

विंग - येथे डेंगीचे दोन संशयित रुग्ण आढळले. कऱ्हाडला खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोळेचे प्राथमिक आरोग्य पथकाने येथे सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून सर्वेक्षणात डेंगीच्या डासांच्या आळ्याही आढळून आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर डास निर्मूलन मोहीम हाती घेण्याची गरज आहे.     

स्वाइन फ्लू संशयित रुग्णानंतर आता डेंगीचे रुग्णही आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कोळेच्या प्राथमिक आरोग्य पथकाने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक विजय काळे व अनिल काळे, आरोग्यसेवक युवराज शेवाळे, संतोष जाधव, आरोग्य सेविका पी. एस. जाधव, एम. एस. गावित, एस. एस. पाटोळे, एस. व्ही. सावंत आदी सर्वेक्षण करत आहेत. प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून डास निर्मूलनाची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने तसे लेखी पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता डेंगीसदृश लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या संदर्भात उद्या (ता. २) येथे ग्रामसभा आयोजित केली आहे.

Web Title: satara news dengue