कर्मचारी खेळाडूंची अनुपस्थिती नको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

सातारा - राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबतचे परिपत्रक शासनाने नुकतेच काढले आहे. त्यामुळे शासन सेवेतील गुणवंत खेळाडूंना स्पर्धेपूर्वीच्या सराव शिबिरांपासून खेळविषयक कार्यशाळांना उपस्थिती लावता येणार असून, त्यांची कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे.

खेळाडू प्रवर्गातून शासन सेवेत नियुक्ती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या खेळविषयक प्रावीण्यात वाढ करण्यास व सर्वार्थाने राज्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्याची संधी असते. शासन सेवेत आल्यानंतर रजेसंदर्भातील अटी व शर्तींमुळे त्या खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांना व स्पर्धापूर्व प्रशिक्षण वर्गात सहभागी होता यावे, यासाठी शासन निर्णयान्वये विशेष नैमित्तिक रजा, प्रवास सवलती, वेतनवाढी मंजूर करण्याचे आदेश देऊनसुद्धा खेळाडूंना हे फायदे न देणे योग्य नाही, असे निश्‍चित केले आहे. परंतु, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दर्जेदार खेळाडूंना योग्य सराव व संधी उपलब्ध करून दिल्यास सर्वोत्तम खेळाडू तयार होतील व राज्याचा व देशाचा नावलौकिक वाढवतील, हे विचारात घेऊन संबंधित प्रशासकीय विभागांनी व विभागप्रमुखांनी संदर्भाधीन शासन निर्णयानुसार देय सवलती देण्याबाबत सर्व कार्यालयप्रमुखांना निर्देशित करण्यात येत आहे, असा आदेश काढला आहे. 

Web Title: satara news Employees do not have the absence of players