शेतकरी संपाचे साताऱ्यात तीव्र पडसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

ग्रामीण भागातील दूध संकलनाच्या गाड्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात घेत आहेत. आनेवाडी टाेल नाका ते जाेशी विहीर या मार्गावर पाेलीस बंदाेबस्तात दुधाचे टॅंकर, भाजी पाल्याच्या गाड्या साेडल्या जात आहेत

सातारा : सातारा जिल्ह्यात शेतकरी संपाचे आज (शुक्रवार)  दुसऱ्या दिवशी तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

सातारा शहरातील बाजार समिती पुर्णत: बंद आहे. ग्रामीण भागातील दूध संकलनाच्या गाड्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात घेत आहेत. आनेवाडी टाेल नाका ते जाेशी विहीर या मार्गावर पाेलीस बंदाेबस्तात दुधाचे टॅंकर, भाजी पाल्याच्या गाड्या साेडल्या जात आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना काेरेगाव येथे आंदाेलन करताना पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे.