फ्लेमिंगो पक्षी... यंदा कुठे करणार ‘लॅंडिंग’? 

फ्लेमिंगो पक्षी... यंदा कुठे करणार ‘लॅंडिंग’? 

कलेढोण - खटाव- माण तालुक्‍यांत वाढत्या गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबर रंगाने गुलाबी असणाऱ्या फ्लेमिंगोच्या (रोहित) आगमनाची प्रतीक्षा पक्षीमित्र करत आहेत. खटावमधील येरळवाडी व सूर्याचीवाडी, तर माणमधील देवापूर- राजेवाडी हे तलाव फ्लेमिंगोची मुक्कामाची आवडती ठिकाणे आहेत. या तलावांत मुबलक व पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पक्षी मित्राच्यांत आनंदाचे वातारणात असून, यातील कोणत्या ठिकाणी परदेशी पाहुणे ‘लॅंडिंग’ करणार? याची उस्तुकता पक्षीप्रेमीना लागून राहिली आहे.

दुष्काळी खटाव- माण तालुक्‍यांतील येरळवाडी, मायणी, कानकात्रे, सूर्याचीवाडी व राजेवाडी या तलावांवर दर वर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात थंडीत फ्लेमिंगो हजेरी लावतात. फेब्रुवारी ते मार्च महिन्यांपर्यंत या पक्षांचे येथे वास्तव्य या तलावांवर असते. उत्तरेकडील देशात वाढणाऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी व अन्नाच्या शोधात देशी- परदेशी पक्षीही तलवावर हजेरी लावतात. त्यांना पाहण्यासाठी व निरीक्षणासाठी कोल्हापूर, सांगली, पुणे आदी 

जिल्ह्यांतील पक्षीप्रेमीही तलावावर हजेरी लावतात. यावर्षी खटाव तालुक्‍यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने हे पाहुणे लवकरच येरळवाडी, सूर्याचीवाडी, देवापूर (राजेवाडी) तलावात ‘लॅंडिंग’ करतील, अशी आशा पक्षीप्रेमी करून आहेत. मागीलवर्षी पाहुण्यांनी येरळवाडी व सूर्याचीवाडी तलावावर मुक्काम केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मायणी परिसरात समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने तलावात पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे तलावाकडे फ्लेमिंगोसह पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. 

नदीसूरय, स्पून बिल आदींची हजेरी
सध्या खटाव तालुक्‍यातील तलावांवर नदीसूरय, स्पून बिल, ग्रे हेरॉन, कांडेसर, चित्रबलाक, कवड्या खंड्या, चांदवा, पांढरापरीट, पाणकावळा, पाणबुडी, पाणपाकोळी, चक्रवाक, शराटी, शेकाट्या आदी पक्षांनी हजेरी लावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com