मॅरेथॉन ही शरीरापेक्षा मनाची शर्यत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सातारा - जीवन ही शर्यत आहे. यामध्ये वेदना असतील तरच आपण शर्यत जिंकतो. तसेच  मॅरेथानबाबत आहे. चढावर पाय उचलत नसले तरी मनातील जिद्द आपल्याला हरू देत नाही. मॅरेथॉन ही शरीरापेक्षा मनाची शर्यत आहे, असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, हिल मॅरेथॉन दोन तासांत पूर्ण करणाऱ्या सातारकरांचा पोलिस दल सन्मान करेल, अशी घोषणा आज पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली. 

मॅरेथॉन असोसिएशन ऑफ साताराने आयोजिलेल्या दहा किलो मीटर अंतराच्या लाँग रनमध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील सहभागी झाले होते. ही रन झाल्यानंतर त्यांनी धावपटूंशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मी सातारकरांकडून ऊर्जा घेण्यासाठी आलो आहे. हिल मॅरेथॉन ही बहरत जाते. पर्वतावर प्रत्येक क्षणाला वेगळी रूप धारण करते. आसपास निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे थकवा जाणवत नाही. जीवन ही शर्यत आहे. त्यात वेदना होणार असतील तरच आपण शर्यत जिंकतो. या मॅरेथानबाबत तसेच आहे. चढावर पाय उचलत नसले तरी मनातील जिद्द आपल्याला हरू देत नाही.’’ 

संदीप पाटील म्हणाले, ‘‘आम्हाला दररोज साताऱ्याबद्दल नकारात्मक गोष्टी पाहण्यास मिळतात. पण, एक सकारात्मक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे सातारा हिल मॅरेथॉन. ही मॅरेथॉन दोन तासांत पूर्ण करणाऱ्या सातारकरांचा पोलिस विभागाद्वारे सन्मान केला  जाईल.’’

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हिल मॅरेथॉनमुळे साताऱ्याची ओळख जगाच्या नकाशावर पोचल्याचे नमूद केले. कार्यक्रमास मॅरेथॉन असोसिएशन ऑफ साताराचे अध्यक्ष ॲड. कमलेश पिसाळ, शेखर घोरपडे, डॉ. प्रताप गोळे, डॉ. संदीप काटे, इर्शाद बागवान उपस्थित होते.