राष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये फलटणच्या चिमुकल्या ईशान मेनसेचे यश

संदीप कदम
शुक्रवार, 7 जुलै 2017

राष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपियाड स्पर्धा परिक्षेमध्ये येथील ईशान मेनसेने अकरावा क्रमांक पटकावून यश मिळविले आहे. तर जाज्वल्य सदावर्ते व अनुष्का पाटील या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करुन जिल्हाचे नाव देशपातळीवर झळकविले.

फलटण (जि. सातारा) - राष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपियाड स्पर्धा परिक्षेमध्ये येथील ईशान मेनसेने अकरावा क्रमांक पटकावून यश मिळविले आहे. तर जाज्वल्य सदावर्ते व अनुष्का पाटील या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करुन जिल्हाचे नाव देशपातळीवर झळकविले.

ईशान हा किडस इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि अभ्यासपूर्ण धोरणामुळे किडस इंटरनॅशनळ स्कूलचे विद्यार्थी यशस्वी होत असल्याच्या प्रतिक्रिया शाळेच्या अध्यक्ष वैशाली शिंदे यांनी व्यक्त केल्या. शाळेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची शालेय अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी एमटीएस, ऑलिंपियाड, क्विझ कॉन्टेस्ट, ऍबॅकस तसेच वैदिक मॅथ्स इत्यादी प्रकारच्या उपक्रम किंवा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाल्या.

मागील वर्षातही ऑलिंपियाड परिक्षेत नऊ मुलांनी सुवर्णपदक पटकावले होते. तर याच परिक्षेत चालू वर्षात 13 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामध्ये इयत्ता पहिलीतील ध्रुवी मेहता, जीत होरा, श्रीजना माने, स्वरा अटक, अर्णव ससाणे, संकीशा सोरटे, विभा शिर्के, श्रेया शिंदे, जान्हवी पावरा, इयत्ता दुसरीतील ईशान मेनसे, इयत्ता तिसरीतील अनुष्का पाटील, इयत्ता चौथीतील श्रवस्ती अहिवळे, इयत्ता पाचवीतील श्रेयश अहिवळे यांनी यश मिळवले आहे. याच बरोबर या ऑलिंपियाड परीक्षेमध्ये दिल्ली येथील घेण्यात आलेल्या टेलिफोनिक इंटरव्ह्यूसाठी ईशान मेनसे (इयत्ता दुसरी), अनुष्का पाटील (इयत्ता तिसरी), श्रावस्ती अहिवाळे (इयत्ता चौथी) आणि विभा शिर्के (ज्युनियर केजी) यांची निवड झाली आहे.