कऱ्हाडमधील बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी संपावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

कऱ्हाड (सातारा): मोबाईल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करण्याच्या निर्णयाला बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध करत दोन दिवस संप पुकारला आहे. या देशव्यापी संपास पाठिंबा देत कऱ्हाडमधील बीएसएनएलचे 100 हून अधिक कर्मचारी, अधिकारी संपावर गेले आहेत.

देशभरातील तब्बल 65 हजार मोबाईल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करण्यात येणार आहे. त्याला विरोध करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे. त्यामुळे आज (मंगळवार) कऱ्हाड कार्यालयातील बीएसएनएलचे सर्व कामकाज ठप्प झाले होते. टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करून खाजगी मोबाईल कंपन्यांचे भले करत बीएसएनएलला खिळखिळीत करण्याचा डाव आखला जात असल्याचाही आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. टॉवरची उपकंपनी करण्याचा निर्णय सरकारने मागे घेत तिसरा वेतन करार लागू करावा, अशी मागणीही आंदोलन कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आज सकाळी दहाच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत कामगार विरोधी व खासगी कंपनी धार्जिण्या धोरणाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Web Title: satara news karad bsnl employees strike