खूनप्रकरणी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोरेगाव - येथील युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आज एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली. खून प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आज शहरात कडकडीत "बंद' पाळण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात असलेल्या राजकीय संशयितांवर कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढून "रास्ता रोको' केला. अटक केलेल्यांमध्ये करण शशिकांत बनकर (वय 21) व एका 17 वर्षीय मुलाचा (दोघेही रा. कळकाई गल्ली, कोरेगाव) समावेश आहे. 

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील बस स्थानकासमोरील एका हॉटेलपुढे अज्ञातांनी धारदार शस्त्राने शंभू बबन बर्गे (रा. वेताळ गल्ली, कोरेगाव) या युवकावर प्राणघातक हल्ला केला होता. शंभूच्या छातीत सुरा खुपसल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात मंदार आबासाहेब बर्गे याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर कालपासून शहरात तणाव आहे. दरम्यान, शंभूच्या खूनप्रकरणी कालच दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, संशयितांवर कारवाई न झाल्यास बेमुदत "बंद'चा इशारा काल रात्री नागरिकांनी दिला होता. त्यानुसार आज शहरात कडकडीत "बंद' पाळण्यात आला. बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प होते. शाळा, महाविद्यालयेही सोडून देण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास नागरिकांनी मोर्चा काढला. या वेळी हिंद भवन चौकात "रास्ता रोको' झाला. या प्रकरणातील संशयित, तसेच खून प्रकरणामध्ये हात असलेल्या राजकीय प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन होईल, अशा आशयाचे निवेदन मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले. दरम्यान, शंभूच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आज दोघांना अटक केली. त्यापैकी करण यास येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, अल्पवयीन मुलाला सातारा येथील बाल न्यायालयापुढे उभे केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स