पश्चिम महाराष्ट्र भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगर होता. त्याची खोली सत्तर किलोमीटर होती. भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र, भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती.

कऱ्हाड : कोयना धरण परिसराला शनिवारी रात्री 10.25 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्‍टर स्केल आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात त्याची तीव्रता अधिक जाणवली.

भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगर होता. त्याची खोली सत्तर किलोमीटर होती. भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र, भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती.

भूकंपानंतर या परिसरातील कोयनेसह इतर सर्व धरणे सुरक्षित आहेत, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातील भूकंपतज्ञ एम. टी. जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

ते म्हणाले, ''भूकंपाचे केंद्र पुण्यापासून १४० किलोमीटर अंतरावर आहे. कोयनानगर परिसरात आतापर्यंत याच केंद्रातून भूकंप झाले आहेत. या वेळी भूकंपाचे जमिनीच्या खाली दहा किलोमीटर मिटर आहे. या भूकंपाने कुठलीही मोठी हानी झाली नाही.'' या भूकंपाने कोयना धरणावर कोणलाही परिणाम झाला नाही. धरण भक्कम असल्याने ते सुरक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.