बस चालकास चक्कर आल्याने अपघात; १० प्रवासी जखमी

संदीप कदम
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

राजाळे गावचे हद्दीत एस टी आली असता अचानक बसचालक रामदास सुर्यभाम मिश्राम (वय ३६) यांचा चक्कर आली.

फलटण शहर : आसू - फलटण मार्गावरील राजाळे गावच्या हद्दीत बस चालकास चक्कर आलेल्याने झालेल्या अपघात १० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांचेवर फलटण येथील शासकीय रुग्णालयत उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आसू (ता. फलटण) येथे नियमित एस टी वाहतूक करणारी बस सकाळी पावणे अकरा वाजता फलटणकडे रवाना झाली. यावेळी राजाळे गावचे हद्दीत एस टी आली असता अचानक बसचालक रामदास सुर्यभाम मिश्राम (वय ३६) यांचा चक्कर आली. यामुळे बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याशेजारी शेतात जावुन पलटी झाली. या अपघातात बस मधील चालकासह १० प्रवासी जखमी झाले असून या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पातळीवर नागरिकांनी मदत पोहचवुन सर्व प्रवासांना बाहेर काढून फलटण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

चालकाची तब्यत सुस्थितीत असून पहिल्यांचाच चक्कर आल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी प्रवासांपैकी किसन दिनकर खटके यांना हडांच्या दवाखान्यात पाठविण्यात आले आहे तर उर्वरीत प्रवासी किरकोळ जखमी असून  कोणताही धोका नसल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स