सातारा पोलिसांकडून  अटक सत्र तीव्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सातारा - खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांत येथे झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी पोलिसांनी अटक सत्राची मोहीम तीव्र केली आहे. आज माजी स्वीकृत नगरसेवक व पालिका कर्मचाऱ्यासह दोन्ही गटांच्या एकूण पाच जणांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

उदयनराजे समर्थक स्वीकृत नगरसेवक शशांक ऊर्फ बाळासाहेब प्रभाकर ढेकणे (वय 43, रा. करंजे), इम्तियाज बाळासाहेब बागवान, शिवेंद्रसिंहराजे समर्थक पालिकेचा आरोग्य कर्मचारी उत्तम यशवंत कोळी (वय 22, रा. रासपुरा पेठ), निखिल संजय वाडकर (वय 21, रा. करंजे पेठ) व अनिकेत अशोक तपासे (रा. मल्हार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

कोजागरीच्या रात्री साताऱ्यात दोन्ही राजांच्या गटात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी अटक सत्राची मोहीम तीव्र केली आहे. कालपर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली होती. सध्या सर्व जण पोलिस कोठडीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. आज आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.