विरोधक एकवटल्यास "राष्ट्रवादी'ची अडचण! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सातारा - नियोजन समितीच्या निवडणुकीत शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात कोण कोणाशी हात मिळवणी करणार यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. कॉंग्रेस, आमदार जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, शिवसेनेची साथ कोणाला मिळणार तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडील मतांची मदत भाजपला, की राष्ट्रवादीला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सातारा - नियोजन समितीच्या निवडणुकीत शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात कोण कोणाशी हात मिळवणी करणार यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. कॉंग्रेस, आमदार जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, शिवसेनेची साथ कोणाला मिळणार तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडील मतांची मदत भाजपला, की राष्ट्रवादीला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नियोजन समितीच्या निवडणुकीत 34 जागांसाठी 83 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण आणि महिला राखीवसाठी विजयासाठी मतांचा कोटा सात आहे, तर पालिका मतदारसंघात विजयासाठी पहिल्या पसंतीची 96 मते लागणार आहेत, तर नगरपंचायतीत विजयासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची 69 मते आवश्‍यक आहेत. सर्व विरोधक एकवटले तरच "राष्ट्रवादी'ला ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे. अन्यथा त्यांचे ठरल्याप्रमाणे कोट्याच्या गणितात उमेदवार विजयी होणार आहेत. खासदार भोसले यांच्या सातारा विकास आघाडीकडे एकूण 32 मते आहेत. त्यांची भाजपला, की राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत होणार त्यावर त्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. 

मतांचा कोटा पूर्ण करताना विरोधकांना एकमेकांची मदत घ्यावीच लागणार आहे; पण त्यांची एकी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेस, भाजप, आमदार जयकुमार गोरे, आमदार शंभूराज देसाई, शिवसेना यांची मते एकवटली गेल्यास राष्ट्रवादीला पालिका व नगरपंचायतीत अडचणीचे ठरू शकते. आतापर्यंत तरी विरोधक एकवटण्याच्या हालचाली दिसत नसल्यातरी ऐनवेळी हे विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता फारशी नाही. सध्या खासदार भोसले यांच्याकडील मतांचा पालिका व जिल्हा परिषदेतील मतांची मदत भाजपला होणार, की राष्ट्रवादीला हे कोडे अद्याप उलगडलेले नाही. 

साविआ व भाजप एकमेकांना सूचक! 
उमेदवारी अर्ज भरताना साविआ व भाजपचे उमेदवार एकमेकांना सूचक झालेले आहेत. त्यामुळे खासदारांकडील मते भाजपच्या पारड्यात जाणार हे निश्‍चित आहे; पण उदयनराजेंचा जामीन झालेला असल्याने त्यांच्याकडून काही वेगळी सूचना सदस्यांना जाणार का, यावर नियोजनचे गणित  अवलंबून आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

हुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची...

02.00 PM

अकोले : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू...

01.24 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रोहम वस्तीवर राहणारे शेतकरी कैलास चत्तर यांच्या विहिरीत तीन महिन्याच...

12.42 PM