सकाळ शॉपिंग सेलिब्रेशन २०१७ चे आयोजन

सातारा - सकाळ शॉपिंग सेलिब्रेशन २०१७ या योजनेचा प्रारंभ गुरुवारी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तानाजी गायकवाड, विपुल शहा, दिलीप गुरव, राजेश निंबाळकर, बिपीन शहा, संजय धायगुडे, समीर जोशी, हेमंत शहा, अभिजित पिसाळ आदी.
सातारा - सकाळ शॉपिंग सेलिब्रेशन २०१७ या योजनेचा प्रारंभ गुरुवारी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तानाजी गायकवाड, विपुल शहा, दिलीप गुरव, राजेश निंबाळकर, बिपीन शहा, संजय धायगुडे, समीर जोशी, हेमंत शहा, अभिजित पिसाळ आदी.

सातारा - सकाळतर्फे सप्टेंबरपासून दसरा- दिवाळी सणांच्या निमित्ताने सकाळ शॉपिंग सेलिब्रेशन २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंर्तगत टाटा टिॲगो (एक्‍स इ) या मेगा बंपर बक्षिसासह सुझुकी एन ॲक्‍सेस, होंडा सीडी ११० मोटारसायकल, हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, तसेच एक तोळा सोने अशी सुमारे १३ लाख रुपयांची बक्षिसे मिळविण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, कऱ्हाड अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, हेम ग्रुपचे सीएमडी बिपीन शहा, संचालक विपुल शहा, संचालक हेमंत शहा, संचालक अभिजित पिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन बनवणे, ‘सकाळ’चे शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, वितरण व्यवस्थापक तानाजी गायकवाड, जाहिरात व्यवस्थापक संजय कदम, जाहिरात सहायक व्यवस्थापक मेलविन डिमेलो यांच्या उपस्थितीत या बक्षीस योजनेचा प्रारंभ करण्यात आला. २० सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर हा या योजनेचा कालावधी आहे. योजनेत सहभागी झालेल्या सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांकडे खरेदी केल्यानंतर त्या व्यावसायिकांकडून ग्राहकांना भेट कूपन मिळेल. भेट कूपन मिळालेल्या ग्राहकांना स्क्रॅच व सोडत पद्धतीद्वारे विविध बक्षिसे मिळणार आहेत. याशिवाय या योजनेत सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी तनिष्का, मधुरांगण आणि यंग इन्स्पिरेटर्सच्या सभासदांसाठी खरेदीवर दिवाळीनिमित्त विशेष सवलतीही जाहीर केल्या आहेत.

सकाळ शॉपिंग सेलिब्रेशनची बक्षिसे
मेगा बंपर बक्षीस - टाटा टिॲगो (एक्‍स इ) (प्रायोजक - हेम मोटर्स, सातारा)
पहिले बक्षीस - सुझुकी एन ॲक्‍सेस - १ बक्षीस (प्रायोजक - गजानन सुझुकी, सातारा), दुसरे बक्षीस - होंडा सीडी ११० मोटारसायकल - १ बक्षीस (प्रायोजक - कणसे होंडा, सातारा), तिसरे बक्षीस - हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल - १ बक्षीस (प्रायोजक - सम्राट मोटर्स, सातारा),चौथे बक्षीस - १ तोळा सोने - १ बक्षीस (प्रायोजक - वर्धमान ज्वेलर्स, सातारा), पाचवे बक्षीस - फिलिप्स एलईडी टीव्ही (३२ इंची) - १ बक्षीस (प्रायोजक - शालगर माध्यम, सातारा), सहावे बक्षीस - जी- केम आटाचक्की (१ एचपी) - १ बक्षीस (प्रायोजक - अनंत ट्रेडिंग कार्पो., सातारा), सातवे बक्षीस -  जी- केम आर. ओ. प्युरिफायर - १ बक्षीस  (प्रायोजक - अनंत ट्रेडिंग कार्पो., सातारा), आठवे बक्षीस - इलेक्‍ट्रोलक्‍स फुल ऑटो. वॉशिंग मशिन (६.२ कि. ग्रॅ.) - १ बक्षीस (प्रायोजक - शालगर माध्यम, सातारा), नववे बक्षीस - हिरो स्ट्रीट रेंजर सायकल - ३ बक्षिसे (प्रायोजक - अनंत सायकल, कंपनी सातारा), दहावे बक्षीस - नक्षत्र मिक्‍सर ग्राइंडर - १ बक्षीस (प्रायोजक - प्रतीक एंटरप्रायजेस, सातारा), अकरावे बक्षीस - गॅस शेगडी (सूर्या) - ३ बक्षिसे (प्रायोजक - फिनिक्‍स एजन्सीज, सातारा), बारावे बक्षीस - प्रेस्टीज पॉप्युलर कूकर (३ लिटर) - ३ बक्षिसे (प्रायोजक - प्रतीक एंटरप्रायजेस, सातारा), १३ वे बक्षीस - सेंटर टेबल (मोठा) (टी पॉय) - दहा बक्षिसे (प्रायोजक - व्ही. आर. आर्ट फर्निचर, सातारा), १४ वे बक्षीस - दहा ग्रॅम चांदीचे नाणे - ८५ बक्षिसे (प्रायोजक - जे. के. देवी ॲण्ड सन्स, सातारा).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com