ओढे-नालेसफाईकडे पालिकेचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सातारा - दोन जेसीबी, चार डंपर, 40 कंत्राटी कर्मचारी, चार आरोग्य निरीक्षकांसह पालिकेचे काही कर्मचारी अशा फौजफाट्यानिशी पालिकेचा आरोग्य विभाग पावसाळ्यापूर्वी ओढ्या-नाल्यांच्या सफाईसाठी सज्ज झाला आहे. शहर डोंगरउताऱ्यावर वसल्यामुळे पावसाचे पडणारे पाणी शहरातून वाहून जाते. काही वेळेला नाल्यांत कचरा साठत असल्याने ते तुंबतात. याचा विचार करून, तसेच पाण्याला योग्य वाट मिळावी, यासाठी पालिकेने विविध प्रभागांतील सुमारे 35 ते 40 महत्त्वाच्या नाल्यांसह सात लहान-मोठ्या ओढ्यांची विशेष स्वच्छता मोहीम आखली आहे. 

शहरातील नाले-ओढ्यांत प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाटल्या यासह अन्य कचरा मोठा प्रमाणात साठत असतो. आरोग्य विभागाद्वारे नाल्यांची स्वच्छता नित्यनेमाने सुरू असते. परंतु, पावसाळ्यात पाण्याचा मोठा प्रवाह असतो. परिणामी पाण्याला वाट मिळाली नाही, तर नाल्यातील पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरते. सर्वत्र दुर्गंधी होते. नागरिकांना याचा त्रास होतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वीच ओढे-नाल्यांची स्वच्छता करण्याचे नियोजन केले. त्यासाठी विविध प्रभागांतील महत्त्वाच्या नाल्यांची आणि ओढ्यांची निवड करण्यात आली. आरोग्य निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 40 कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

शहरातील प्रतापगंज पेठ चौक परिसर, कोटेश्‍वर मंदिर परिसर, महात्मा फुले भाजी मंडई परिसर, मंगळवार तळे परिसर, गारेचा गणपती चौक, विठ्ठल मंदिर चौक, जांभळी चौक, गुरुवार परज परिसर, होलार वस्ती समाज मंदिर, पापाभाई पत्रेवाला परिसर, समर्थ मंदिर, पोळ वस्ती, सतीआई मंदिर (करंजे), कमानी हौद परिसर, कूपर कारखाना परिसर, सोन्या मारुती चौक परिसर, फुटका तलाव परिसर आदी ठिकाणच्या नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. ही स्वच्छता जेसीबीच्या माध्यमातून करण्यात येईल. यंत्रणा पोचणे अवघड आहे, तेथे मानवी बळ वापरण्यात येईल. त्यानंतर त्याठिकाणी जंतुनाशक पावडर फवारणी करण्यात येईल, असे पालिका सूत्रांनी सांगितले. 

""शहरातील प्रमुख ओढ्यांची तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या खोलगट भागातील नालेसफाई या विशेष मोहिमेत प्रामुख्याने करण्यात येईल. साधारणत: 12 दिवस ही मोहीम चालेल.'' 

-यशोधन नारकर,  सभापती, आरोग्य विभाग

Web Title: satara news satara municipal corporation

टॅग्स