उदयनराजेंनी सातारकरांना लुटायचे बंद करावेः शिवेंद्रसिंहराजे भोसले

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सातारा ः सातारा पालिकेत XXX पण पैसा आणि कमिशन खाण्याचे काम सुरू आहे. अहो चांगल काम करा. लोकांनी तुम्हांला सत्ता दिली आहे. सातारकरांना लुटायचे बंद करा, अशी परखड टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली. स्थानिकांचा कळवला असलेल्यांनी दिव्या खालचा अंधार दूर करावा, असेही आमदार भोसले यांनी नमूद केले.

सातारा पालिकेत आज (गुरुवार) सकाळपासून घंटागाडी चालक-मालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पालिका प्रशासन आणि आंदोलकांच्यात झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला नाही. दुपारी साडेचार वाजता पालिकेत ठिय्या मांडलेल्या आंदोलकांची नगर विकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट घेत पाठिंबा दिला. या वेळी आमदार भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली. टोलवाल्यांचे काम काढले जाईल म्हणून तुमची तळपायातील आग मस्तकात जाते. परंतु, तुमच्याच पालिकेत बाहेरच्यांना घंटागाडीचे टेंडर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजेच दिव्याखाली अंधार आहे. मी स्थानिकांच्या पाठीशी आहे. माझे 12 नगरसेवक त्यांच्या वॉर्डात बाहेरच्यांची गाड्या फिरू देणार नाहीत, याची हमी देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.