सहा महिन्याच्या बाळाला घरात ठेवून तिने पकडले चोरट्यांना

सचिन शिंदे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नाझीया नायकवडी-शेख असे महिलेचे नाव आहे. त्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या नगरसेविका आहेत. सहा महिन्याच्या लहान बाळाला घरात ठेवून चोरट्यांचा पाठलाग करून पकडले. चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी नायकवडी-शेख यांच्या घरातून लंपास केलेला मोबाईलही त्यांच्याकडून जप्त केला.

कऱ्हाड : चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अल्पवयीन चोरट्यांना घरात सहा महिन्याच्या बाळाला एकटेच ठेवून महिलेने पाठलाग करून पकडले. उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील सुरभी चौकात रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

नाझीया नायकवडी-शेख असे महिलेचे नाव आहे. त्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या नगरसेविका आहेत. सहा महिन्याच्या लहान बाळाला घरात ठेवून चोरट्यांचा पाठलाग करून पकडले. चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी नायकवडी-शेख यांच्या घरातून लंपास केलेला मोबाईलही त्यांच्याकडून जप्त केला. चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या पाठलाग करणाऱ्या नायकवडी-शेख यांचे गावात कौतुक होत आहे. नायकवडी-शेख सांगली -मिरज-कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांचा वर्षापूर्वी विवाह झाल्याने त्या येथे आहेत.

येथील सुरभी चौकात राहणाऱ्या चाँद शेख यांच्या बंगल्याचे अल्पवयीन चार ते पाच मुलांनी दुपारी एकच्या सुमारास भीक मागण्याचे नाटक करून वाजवले. त्यावेळी नाझीया नायकवडी-शेख यांनी दरवाजा उघडला. पुढे व्हा, असे म्हणून त्यांना दरवाजा बंद केला. त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी दरवाजाच्या ग्रीलमधून हात घालून हळूच दरवाजा उघडून ते घरात शिरून आयफोन घेवून ते पळून गेले. त्याची जाणीव झाल्याने नाझीया पटकन बाहेर आल्या. तेव्हा मोबाईल चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्या बाहेर आल्या. तोपर्यंत संबंधित चोरटे समर्थनगरकडे पळाले होते. त्यांनी पटकन दुचाकी बाहेर काढून त्यांचा पाठलाग केला. चोरटे जाधव मळ्याच्या बाजूकडील ऊसाच्या शेतात शिरले. नाझीया यांनी रस्त्यावर गाडी लावली. उसाच्या जावून त्यांनी एकाला पकडले. त्याने तेथेच टाकलेला मोबाईलही त्यांना सापडला. त्यावेळी परिसरातील नागरिक तेथे आले. त्यांनी अन्य मुलांना शोधून काढले. नाझीया यांनी थेट पोलीसांना बालवले. त्यांनी संबधित मुलांना ताब्यात दिले. नाझीया यांना सहा महिन्यांचे बाळ आहे. ते घरी ठेवून त्या चोरट्यांचे मागे धावल्या. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.