‘आरटीओ’ची कोटींची उड्डाणे!

प्रवीण जाधव
बुधवार, 25 एप्रिल 2018

सातारा  - सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या आर्थिक वर्षात महसूल वसुली व विविध प्रकारच्या कारवायांच्या माध्यमातून ११८ कोटींचा महसूल जमा केला. आकर्षक क्रमांकातून सुमारे पाऊणेतीन कोटी तर, वायुवेग पथकाच्या कारवायांतून सुमारे साडेआठ कोटी रुपये वसूल करण्यात आले. 

सातारा  - सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या आर्थिक वर्षात महसूल वसुली व विविध प्रकारच्या कारवायांच्या माध्यमातून ११८ कोटींचा महसूल जमा केला. आकर्षक क्रमांकातून सुमारे पाऊणेतीन कोटी तर, वायुवेग पथकाच्या कारवायांतून सुमारे साडेआठ कोटी रुपये वसूल करण्यात आले. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडेंच्या नेतृत्वाखाली सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे विभागाला अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले. कर वसुलीबरोबरच रस्ता सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या नियमांचे पालन व्हावे यासाठी कारवाया करण्यात आल्या. त्यातून विभागाच्या उत्पन्नातही भर पडली. या वर्षी विभागाला महसूल वसुलीचे १११ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यामध्ये वाहन व परवाना नोंदणी, नूतनीकरण, विविध प्रकारच्या परवान्यांचे शुल्क, तसेच व्यवसाय कर, पर्यावरण कर, आकर्षक क्रमांकातून मिळणारे उत्पन्न, वायुवेग पथकाच्या कारवाया, क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना दंड, अवैध प्रवासी वाहनांच्या दंडाचा समावेश असतो.

वाहनांच्या व वाहन चालविण्याचा परवाना घेणाऱ्यांकडून शुल्क स्वरूपात मिळालेल्या रकमेबरोबर विभागाने वर्षभरात केलेल्या विविध कारवायांमुळे उद्दिष्ट गाठता आले. वायुवेग पथकाने केलेल्या कारवायांतून मिळालेला दंडाच्या रकमेचा वाटाही अधिक आहे. मागील आर्थिक वर्षात या पथकाने दंड व कर वसुलीच्या माध्यमातून ८.४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. आकर्षक क्रमांकाच्या माध्यमातून ३.७१ कोटी रुपये तर, क्षमतेपेक्षा जादा भार वाहणाऱ्या वाहनांवर केलेल्या कारवाईतून १.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

मिळालेला महसूल     (आकडे कोटींत)
                             उद्दिष्ट    पूर्तता

एकूण महसूल    १११.०२    ११८.९८
व्यवसाय कर    १.६७    १.१२
आकर्षक क्रमांक    ......    ३.७१
वायुवेग पथक    ८.७३    ८.४२

Web Title: satara rto recovery