प्रचाराच्या तोफा धडाडणार अन्‌ रात्रीनंतर थंडावणारही!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

जाहीर प्रचार आज संपणार; रात्री दहापर्यंत सभांना परवानगी

सातारा: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील राजकीय आरोपांचे एकमेकांवर प्रहार केले जात आहेत. त्यातून जिल्ह्यातील वातावरण ढवळले आहे. जाहीर प्रचाराला अवघा एक दिवस उरला असल्याने उद्या (ता. 19) तर प्रचाराची राळच उडणार आहे. जाहीर सभांसाठी उद्या रात्री दहापर्यंत, तर ध्वनिक्षेपकाशिवाय रात्री 12 वाजेपर्यंत प्रचाराला मुदत आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. ता. 21 रोजी मतदान होत असल्याने प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. निवडणूक आयोगाने उद्या रात्री दहापर्यंत जाहीर सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर रात्री 12 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांची भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या सकाळी दहा वाजता कुकुडवाड येथे जाहीर सभा होणार आहे, तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यासह आमदार, माजी आमदार, पक्षीय नेत्यांच्या आपल्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगता सभा होणार आहेत. त्यामुळे उद्या दिवसभर प्रचाराची राळ उडेल, यात शंका नाही.

दिसणार शक्‍तिप्रदर्शन...
जिल्ह्यातील जाहीर प्रचार उद्या संपणार असल्याने मतदारांवर छाप टाकण्यासाठी प्रबळ उमेदवारांकडून शक्‍तिप्रदर्शनही केली जाईल. त्यासाठी जाहीर सभा, रॅली, पदयात्रा, सांगता सभा आदींचा मार्ग धरला जाईल. त्यामुळे जिल्हाभर राजकीय ज्वर टोकला जाणार आहे.

Web Title: satara: zp and pancayat samiti election