भाजप नेत्यांच्या निधीच्या थापा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

कडेगाव : नगरपालिका विकासासाठी शंभर कोटी रुपये देतो, असे भाजपचे नेते राज्यभर जाऊन सांगत आहेत. त्यांच्या आश्‍वासनांचा राज्याचा आकडा दहा हजार कोटींपेक्षा जास्त होतो, पण निधी द्यायचाच नसल्याने त्यांना फिकीर नाही. बोलाचा भात अन्‌ बोलाची कडी आहे, थापा मारून फसवण्याचा डाव आहे, असा आरोप कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज येथे केला. 

येथे नगरपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पॅनेलच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, भीमराव मोहिते उपस्थित होते. 

ते म्हणाले, ""सारे नेते तिजोरी उघडून ठेवत आहेत, त्यात मुख्यमंत्रीही सहभागी झाले आहेत. तेही खरे बोलायला तयार नाहीत. भाजप नेते आता जुन्या नोटा देणार की काय, अशी शंका यायला लागली आहे. मतदारांनी थापांना बळी पडू नये. कॉंग्रेस नेत्यांच्या साखर कारखान्यांनी शंभर टक्के उसाची बिले दिली आहेत. भाजपच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांनी एफआरपीचे पैसेसुद्धा दिलेले नाहीत. पतंगरावांनी एकही विकास काम मागे ठेवले नाही. पायाभूत सुविधा, शासकीय कार्यालये, सिंचन योजना प्रभावीपणे केले आहे. विरोधक कुठल्या मुद्यावर निवडणूक लढवत आहेत, हेच समजत नाही.'' 

आमदार मोहनराव कदम म्हणाले, ""पतंगरावांनी गेल्या मंत्रिपदाच्या काळात कडेगावचा विकास केला. रस्ते, सिंचन योजनांचे पाणी आणून दुष्काळ हटवला. आता दोन आमदार आहेत. आणखी चालना मिळेल.'' 

विश्‍वजित कदम म्हणाले, ""विरोधक येथे विकास झाला नाही असा चुकीचा आरोप करत आहेत. ते अज्ञानीपणा दाखवत आहेत. पूर्वीचे कडेगावचे चित्र आठवा. आजचे कडेगाव पाहावे.'' 

सुरेश निर्मळ, भीमराव मोहिते, सतीश पाटील, प्रकाश जाधव, सत्यजित यादव, मालन मोहिते यांची भाषण झाली. जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, शांतारामबापू कदम, भाऊसाहेब यादव, दीपक भोसले, गुलाम पाटील, इंद्रजित साळुंखे, शोभा होनमाने, सुनंदा निर्मळ, नीता पवार, विजय शिंदे उपस्थित होते. 

पतंगरावांना फोन 
सतेज पाटील म्हणाले, ""भाजपचे नेते सकाळी भाषण ठोकून जातात, रात्री पतंगरावांना फोन करतात. साहेब फार मनावर घेऊ नका, प्रचाराला यावे लागते, बोलावे लागते, राग मानू नका, असे सांगतात. मी साक्षीदार आहे.'' 

Web Title: Satej Patil slams BJP in Kadegaon rally