शाळांतील वाय-फाय जोडणी कागदावरच!

Wi-Fi
Wi-Fi

कऱ्हाड - विद्यार्थ्यांना पुस्तकापलीकडील माहिती व्हावी या हेतूने अनेक शालेय पुस्तकांवर क्‍यूआर कोड छापण्याचा आणि त्याला ॲप जोडून त्याद्वारे पूरक माहिती देण्याचा उपक्रमही राबवण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व शाळा वाय-फायने जोडण्याची घोषणा केली. मात्र, सध्या ती कागदावरच राहिली असल्याचे दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲपव्दारे माहिती देण्याचाही उपक्रम बारगळल्यात जमा आहे. ही सुविधा सुरू झाली तरीही ग्रामीण भागात रेंजचीही मोठी समस्या निर्माण होणार आहे. 

शिक्षण विभागात सध्या सर्व माहिती ऑनलाइन देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रेंज नाही, ज्या शाळांत संगणक नाहीत, ज्या शाळेत वीजपुरवठा नाही, अशा अनेक शाळांतील शिक्षकांना शिक्षण विभागाकडून सातत्याने मागितली जाणारी माहिती ऑनलाइन भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये तळ ठोकावा लागतो. त्याचबरोबर राज्यातील शिक्षकांच्या मागे ‘तंत्रस्नेही’ शिक्षक अशी बिरुदावली चिटकवली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकापलीकडील माहिती देण्यासाठी पुस्तकांवर क्‍यूआर कोड छापण्याचा आणि त्याला ॲप जोडून पूरक माहिती देण्याचा उपक्रमही राबवण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी सर्व शाळा वाय-फायने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, ती सध्या तरी कागदावरच राहिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲपव्दारे माहिती देण्याचाही उपक्रम बारगळला आहे.

त्याचबरोबर जरी ही सुविधा सुरू झाली तरी ग्रामीण भागात रेंजचीही समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर राज्यातील अनेक शाळांत संगणक नाहीत, तर काही शाळांत अद्यापही वीजपुरवठा सुरू झालेला नाही, असे पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे वाय-फायची योजना प्रत्यक्षात उतरणार का, हा प्रश्नच आहे.

शाळांच्या समस्याही कायमच 
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत स्वच्छतागृहे आहेत, पण पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा आहे, पण शुद्ध पाणी नाही, अशी परिस्थिती आहे. अनेक शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. अद्यापही पोषण आहार शिजवण्याची वेळ काही ठिकाणी शिक्षकांवरच येते. त्यामध्ये शिक्षकांचा वेळ जात असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. अनेक वर्षांपासूनच्या या समस्या अद्यापही कायमच दिसतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com