शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ प्रा. यश पाल यांचे निधन; ‘विज्ञान गुरू’ म्हणून होते लोकप्रिय

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विज्ञानविषयक अनेक समित्यांचे त्यांनी सदस्य व सल्लागार म्हणून काम पाहिले.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल घडविणारे प्रा. यश पाल यांचे काल (सोमवार) रात्री निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. 

प्रा. पाल यांनी टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेतून कारकिर्दीला सुरवात केली. प्रा. यश पाल हे दूरदर्शनवरील ‘टर्निंग पाँईंट’ या विज्ञान मालिकेतून ‘विज्ञान गुरू’ म्हणून ते ओळखले जात होते. या मालिकेतून पाल हे विज्ञानातील अनेक रहस्ये रंजक पद्धतीने उलगडून सांगत.

विज्ञानातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना १९७६ मध्ये पद्मभूषण तर २०१३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विज्ञानविषयक अनेक समित्यांचे त्यांनी सदस्य व सल्लागार म्हणून काम पाहिले. यश पाल यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळवल्यावर १९५८ मध्ये मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएच.डी. मिळवली होती. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर - नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ रद्द करा नाहीतर...

04.21 AM

सातारा - समन्वयाचा अभाव असलेली सातारा विकास आघाडी, सातत्य राखण्यात कमी पडलेली नगर विकास आघाडी, प्रत्येकाचा सवतासुभा असलेली...

03.30 AM

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून कर वसुलीसाठी कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. 19)...

03.21 AM