शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आठ एप्रिलला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

कोल्हापूर - येथील पालक मंच संवेदना व धन्वंतरी माइंड केअरतर्फे आठ एप्रिलला माइंड-मॅटर्स शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल व स्पर्धा होत आहे. सकाळ माध्यम समूह, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व रेडिओ मिर्ची या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम होईल. 

दरम्यान, फॉर्म भरल्यानंतर आपली शॉर्ट फिल्म मंगळवार (ता. २८) पर्यंतच एका सीडीवर .mp४/.mpeg/.avi ॅरमॅटमध्ये पाठवायची असून इच्छुकांनी लवकरात लवकर त्या फिल्म सादर कराव्यात, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

स्पर्धेत सोळा वर्षांवरील व्यक्ती (व्यावसायिक वा हौशी) भाग घेऊ शकतात. इच्छुकांनी http://goo.gl/७AxrWc‘ या लिंकवर फॉर्म ऑनलाइन भरायचा आहे. चला-नैराश्‍यावर बोलू या, सोशल मीडिया : शाप की वरदान, जनरेशन गॅप, तसेच व्यसन या विषयांवर शॉर्ट फिल्म पाठवायच्या आहेत. जास्तीत जास्त दहा मिनिटांची फिल्म असावी. ती कोणत्याही भाषेत असावी. इंग्लिश सोडून इतर भाषेतील फिल्म असल्यास, त्याला इंग्लिश सबटायटल्स असावीत. फिल्म बनवण्यासाठी कोणत्याही साधनांचा वापर करता येईल.

वापरलेल्या साधनांचा तपशील स्पर्धकांनी फॉर्म भरताना दिलेल्या जागेत लिहायचा आहे. जर दोन फिल्ममध्ये गुणांची बरोबरी झाली, तर साध्या-सोप्या पद्धतीने व सामान्य साधनांचा वापर केलेल्या फिल्मला जास्त गुण मिळतील. ज्यांना दिलेल्या विषयांवर आपलं मत, इच्छा मांडायची आहे, ज्यांना मानसिक आरोग्याबाबत जाणून घ्यायचं आहे, त्या सगळ्यांसाठी माइंड-मॅटर्स आहे. चला, तर मग स्पर्धेत सहभागी होऊ या...!