श्रद्धा हाकेला 3 हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक

श्रद्धा हाकेला 3 हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक

मंगळवेढा : तालुक्यातील खुपसंगी येथील कामसिध्द विद्यालयाची खेळाडू श्रद्धा भारत हाके हीने कराड येथे आजपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत 3000 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. तालुक्यात भाग्यश्री बिले नंतर सुवर्णपदकाचा मान मिळाला.

तिची बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यात ती महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कऱ्हाड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारपासून राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धांना कऱ्हाडमध्ये घेण्यात येत आहेत. राज्यभरातून स्पर्धांसाठी सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी झाले.  श्रद्धाला तिचे क्रिडा शिक्षक विठ्ठल बिले व पंढरपूर येथील क्रीडा मार्गदर्शक चेतन धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com